Video| बाळू धानोरकरांची कबड्डीच्या मैदानात एन्ट्री, समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हयरल; पहा काय म्हणाले नेटकरी?

Video| बाळू धानोरकरांची कबड्डीच्या मैदानात एन्ट्री, समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हयरल; पहा काय म्हणाले नेटकरी?

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी चक्क कबड्डीच्या मैदानात उतरून कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला. ते केवळ मैदानात उतरले नाहीत, तर त्यांनी एक गडी देखील बाद केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 06, 2022 | 9:10 PM

यवतमाळ : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी चक्क कबड्डीच्या मैदानात उतरून कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला. ते केवळ मैदानात उतरले नाहीत, तर त्यांनी एक गडी देखील बाद केला. बाळू धानोरकर हे कबड्डी खेळत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी धानोरकर यांच्या चपळाईचे कौतुक केले आहे. धानोरकर यांनी मोठ्या चपळाईने प्रतिस्पर्धी गटातील एका खेळाडूला बाद केले.

मोरगावात स्पर्धेचे आयोजन

मोरगाव तालुक्यातील मार्डी ग्रामपंचायत आणि न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी यांच्या वतीने गावात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस खासदार बाळू धानोरकर हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जय जनन्नाथबाबा क्रीडा मंडळ आणि न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी  यांच्यात सामना सुरू असताना, धानोरकर यांनी अचानक मैदानात एन्ट्री घेतली. ते सामन्यात केवळ उतरलेच नाहीत तर त्यांनी एक गडी देखील बाद केला. या निमित्ताने धानोरकर यांच्यामध्ये लपलेल्या खेळाडूचे उपस्थितांना दर्शन झाले.

व्हिडीओ व्हायरल  

दरम्यान बाळू धानोरकर यांचा कबड्डी खेळतानाचा हा व्हिडीओ काही क्षणातच सामाजिक माध्यमांवर तुफान व्हायलर झाला. नेटकऱ्यांनी धानोरकर यांचे कौतुक केले आहे. धानोरकर हे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला.

संबंधित बातम्या 

अंधेरी आणि कुर्ला प्रभागाचे विभाजन होणार, मुंबईतील वॉर्ड संख्या 24वरून 26 वर पोहोचणार

सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत, आंदोलनाच्या नावावर वर्गणी गोळा केली; मनिषा कायंदेंचा घणाघात

VIDEO: पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें