अंधेरी आणि कुर्ला प्रभागाचे विभाजन होणार, मुंबईतील वॉर्ड संख्या 24वरून 26 वर पोहोचणार

अंधेरी आणि कुर्ला प्रभागाचे विभाजन होणार, मुंबईतील वॉर्ड संख्या 24वरून 26 वर पोहोचणार
bmc

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच मुंबईत आणखी दोन वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी आणि कुर्ल्याचे विभाजन करून दोन वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 06, 2022 | 5:48 PM

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच मुंबईत आणखी दोन वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी आणि कुर्ल्याचे विभाजन करून दोन वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वॉर्डांची संख्या आता 24 वरून 26 होणार आहे.

विशेष म्हणजे महापालिका प्रशासनानेच दोन प्रभागांच्या विभाजानाचा प्रस्ताव मांडला आहे. अंधेरी पूर्व (के/पूर्व) आणि कुर्ला (एल) हे दोन्ही वॉर्ड अत्यंत मोठे आहेत. प्रशासकीय कामकाजासाठीही ते गैरसोयीचे असल्याने या दोन्ही वॉर्डांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. छोटे वॉर्ड असल्याच प्रशासकीय सोयीसाठी आणि जनतेच्या कामासाठी त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो, त्यामुळेच या दोन्ही वॉर्डच्या विभाजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

समितीच्या अहवालानंतर निर्णय

दरम्यान, या दोन वॉर्डाचे विभाजन करण्यासाठी महापालिकेने आधी समिती नेमली होती. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे आणि भारत मराठे यांच्या समितीने अभ्यास करून अहवाल सादर केला होता. वॉर्डातील लोकसंख्या, सुविधा, प्रशासनावर येणारा ताण, नागरिकांची होणारी गैरसोय आदी मुद्द्यांचा या समितीने अभ्यास करून के पूर्व आणि ‘एल’ विभागाचे विभाजन करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेत आला आहे.

या वॉर्डाची होणार विभागणी

एल वॉर्ड हा मोठ्या वॉर्डपैकी एक समजला जातो. या वॉर्डात एकूण 16 नगरसेवक येतात. या वॉर्डात सुमारे नऊ लाख लोक राहतात. त्यामुळे एल दक्षिण आणि एल उत्तर असे दोन वॉर्ड करण्यात येणार आहे. एका वॉर्डाची इमारत कुर्ला (पश्चिम) डेपोजवळ आहे तिथेच राहील. तर नव्या वॉर्डाची इमारत चांदिवली येथे करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे चांदिवली आणि परिसरातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी कुर्ल्यात येण्याची गरज पडणार नाही. या शिवाय के पूर्व या विभागाचे के दक्षिण व के उत्तर असे दोन भाग करण्याचा प्रस्ताव आहे. के पूर्वमध्ये 15 नगरसेवक येतात. के पूर्वमध्ये 8 लाख 23 हजार लोक राहतात. तर, पी उत्तर (मालाड ) या वॉर्डाचे मालाड पूर्वेला पी पूर्व तर मालाड पश्चिम म्हणजे पी पश्चिम असे दोन वॉर्ड करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अशी होणार प्रक्रिया

गटनेत्यांच्या बैठकीत वॉर्डाच्या विभाजनावर चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर हा प्रस्ताव महापालिका महासभेत मांडला जाईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर दोन वॉर्डांची विभागणी केली जाऊन नवे वॉर्ड अस्तित्वात येतील.

संबंधित बातम्या:

VIDEO: पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

PM Security Breach: 500 शेतकरी मरण पावले, त्यासाठी कुणाला फासावर लटकवायचे?; राऊतांचा सवाल

शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें