AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajeev Satav Funeral | राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला, कार्यकर्त्यांना शोक अनावर

खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. (Congress MP Rajeev Satav Funeral at Hingoli)

Rajeev Satav Funeral | राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला, कार्यकर्त्यांना शोक अनावर
Rajeev Satav
| Updated on: May 17, 2021 | 8:48 AM
Share

पुणे: काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव  (Congress MP Rajeev Satav)  यांचे रविवारी (16 मे) पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. आज सोमवारी (17 मे) हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Congress MP Rajeev Satav Funeral at Hingoli)

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. सध्या त्यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.  अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत.

पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन

राजीव सातव यांचे काल पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज अखेर काल संपली.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

राजीव सातव यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली आहे. राज्याने एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे, अशा शब्दात अनेक नेते मंडळींनी दु:ख व्यक्त केलं. हिंगोलीत काँग्रेससह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.

सातव यांचा अल्प परिचय

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.

चार वेळा ‘संसदरत्न’

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.  (Congress MP Rajeev Satav Funeral at Hingoli)

संबंधित बातम्या :

कोरोनाने गांधी कुटुंबाचे दोन ‘आधार’ हिरावले, अहमद पटेलांनंतर राजीव सातव यांचं निधन

MP Rajeev Satav Death | राजीव सातव हे उभरतं नेतृत्व, मी संसदेतील चांगला मित्र गमावला : पंतप्रधान मोदी

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल