AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो नवा व्हायरस, आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: पुण्याला जाणार!

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे उद्या रविवारी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) जाऊन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.

राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो नवा व्हायरस, आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: पुण्याला जाणार!
Rajeev Satav_Rajesh Tope
| Updated on: May 15, 2021 | 5:45 PM
Share

जालना : काँग्रेसचे राज्यसभेचा खासदार राजीव सातव  (Congress MP Rajeev Satav)  यांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे उद्या रविवारी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) जाऊन सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत आरोग्य मंत्र्यांनी नवी माहिती दिली आहे. (Congress MP Rajeev Satav health update Maharashtra Health minister Rajesh Tope to visit Pune Jehangir hospital)

राजीव सातव यांची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला असून, हा व्हायरसही नवीन प्रकारचा व्हायरस आहे. याबाबतीत राजीव सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरशी आपण संपर्कात असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ” राजीव सातव यांची प्रकृती थोडी नाजूक आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. राजीव सातव बरे होत असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवा व्हायरस सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असून इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण डॉक्टर पूर्णत: प्रयत्न करत आहेत, काळजी घेत आहेत. सर्वकाही उपचार केले जात आहेत. तज्ज्ञातले तज्ज्ञ डॉक्टर बोलावून आपल्या मराठवाड्यातील या सुपुत्रावर उपचार केले जात आहेत. मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. मी स्वत: उद्या त्यांना भेटण्यासाठी जात आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत”

म्युकरमायकोसिस

म्युकर मायकोसिस रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या उपचारांबाबतीत काही निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. म्युकर मायकोसिस रुग्णांसाठी 4 ते 5 प्रकारचे डॉक्टर लागतात आणि त्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य असलेल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांसाठी उपचार करण्यात येणार आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये नाक, कान, घास, ब्रेन तज्ञ असतील असे ठराविक हॉस्पिटल निवडले जाणार आहेत. म्युकरमायकोसिस पेशंटसाठी वेगळे वॉर्ड तयार केले असून, वेगळी टीम करण्यात येणार आहे. म्युक मायकोसिस रुग्णाला लागणारे अनफोटेरेसिन ‘बी’ चे एक लाख इंजेक्शनचे टेंडर काढण्यात आले असून आज पाच वाजेपर्यंत फायनल करण्यात येईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजीव सातव 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेल्या राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

कोरोनाची लक्षणे 

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

VIDEO :  राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? 

संबंधित बातम्या 

खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर, 23 दिवसांपासून व्हेटिंलेटरवर

(Congress MP Rajeev Satav health update Maharashtra Health minister Rajesh Tope to visit Pune Jehangir hospital)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.