“माफीवीरजी, माफी मागा!, देश वाट बघतोय”, ‘अग्निपथ’वरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अग्निपथ योजनेवरून सध्या देशातील तरूण आक्रमक झाले आहेत. विरोधीपक्षही मोदी सरकारवर टीकास्त्र डागतंय. काँग्रेसनेही माफीवीर म्हणत मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केलाय.

माफीवीरजी, माफी मागा!, देश वाट बघतोय, अग्निपथवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
| Updated on: Jun 18, 2022 | 6:01 PM

मुंबई : अग्निपथ योजनेवरून सध्या देशातील तरूण आक्रमक झाले आहेत. विरोधीपक्षही मोदी सरकारवर टीकास्त्र डागतंय. काँग्रेसनेही माफीवीर म्हणत मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केलाय. “माफीवीरजी, माफी मागा!, देशातील तरूण वाट बघतोय”, असं ट्वीट काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आहे.

“सेंट्रल विस्टावर 20,000 करोड खर्च करणारे लोक, युवकांना को ‘अग्निपथ’ चालायला मजबूर करत आहात. असं कसं चालेल मोदीजी?”, असंही ट्विट काँग्रेसच्या वतीने करण्यात आलंय.

सोनिया गांधी यांनी देशभरातील अग्निपथ योजनेशी संबंधित एक पत्र तरुणांना उद्देशून लिहिलंय.

वरुण गांधींचा घरचा आहेर

अग्निपथ या नव्या योजनेवरून खासदार वरून गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अग्निपथ योजनेचा अभ्यास करता हेच लक्षात येतंय की, सरकाने ही योजना आणताना अनेक बाबींचा विचार केला नाही. महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा भारतीय सैन्य, सुरक्षा आणि तरूणांच्या भविष्यावर ‘आधी प्रहार, मग विचार’ हे वागणं संवेदनशील सरकारसाठी उचित नाही”, असं वरुण गांधी म्हणालेत.