Sanjay Rathod : आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? राठोडांच्या मंत्रिपदावरून काँग्रेसचा सणसणीत सवाल

काँग्रेसने फडणवीसांचा राठोडांवरून सरकारवर टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. आणि आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? असा सणसणीत सवाल राठोडांच्या मंत्रिपदावरून विचारलाय. 

Sanjay Rathod : आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? राठोडांच्या मंत्रिपदावरून काँग्रेसचा सणसणीत सवाल
आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? राठोडांच्या मंत्रिपदावरून काँग्रेसचा सणसणीत सवाल
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 09, 2022 | 3:35 PM

मुंबई : गेल्या सव्वा महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज अखेर मुहूर्त सापडला आहे. मात्र शिंदे-फडणवीस (Cm Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताच (Maharashtra Cabinet Expansion) आता वादाची पहिली ठिणगी पडली आहे. पुजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे, संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास आहे.  लडेंगे….जितेंगे, असे म्हणत भाजपच्या चित्रा वाघ यांनीच भाजपला घरचा आहेर दिलाय. तर दुसरीकडे विरोधकांकडूनही सडकून टीका होऊ लागलीय. काँग्रेसने फडणवीसांचा राठोडांवरून सरकारवर टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. आणि आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? असा सणसणीत सवाल राठोडांच्या मंत्रिपदावरून विचारलाय. 

फडणवीसांच्या टीकेचा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला

या व्हिडिओमध्ये फडणवीस म्हणत आहेत, ” या पूजा चव्हाण प्रकरणात मी बघितलं मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या सोबतच्या मंत्र्यांची केविलवाणी स्थिती झालेली आहे. अशी केविलवाणी स्थिती मुख्यमंत्र्यांची येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण ज्यावेळेस धडधडीत खोटं बोलावं लागतं, सगळे पुरावे असताना काही घडलच नाही असं सांगावं लागतं. त्यावेळी जे काही नैतिक धैर्य असतं ते नैतिक धैर्य साथ देत नाही. ते चेहऱ्यावर मास्क असताना देखील स्पष्ट दिसत होतं आणि बोलण्यातही स्पष्ट दिसत होतं.” अशी टीका फडणवीस या व्हिडिओत करत आहेत.

तसेच “मुळातच मुख्यमंत्र्यांनी केवळ याचे उत्तर दिलं पाहिजे, ज्या काही क्लिप्स आहेत त्या खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं, जे काही माध्यमांनी बाहेर काढलं ते खरं की खोटं आणि एवढं झाल्यानंतर जर कोणाला तुम्हाला साधुसंत ठरवायचं असेल तर जरूर त्यांनी ठरवावं. पण मग तुमची नैतिकता काय हे मात्र जनतेसमोर येत. मुख्यमंत्री जनतेला आणि विरोधकांना केवळ सल्ला देतात. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना जर सल्ला दिला तर ते अधिक उचित होईल. पण कदाचित त्यांना असं वाटतं की मंत्री त्यांचा सल्ला ऐकणार नाहीत. अनेक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात, त्यामुळे ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. मुख्यमंत्र्यांचे रोजचे सल्ले त्यांचेच मंत्री धुडकावत आहेत, अशी परिस्थिती पाहायला मिळते” असेही फडणवीस म्हणाले होते. तिच क्लिप आता व्हायरल होतेय.

चित्रा वाघ यांचं ट्विट