Rajeev Satav Death | गांधी कुटुंबाचा निष्ठावान नेता, राहुल गांधींचा विश्वासू मोहरा, कोण होते राजीव सातव?

| Updated on: May 16, 2021 | 10:09 AM

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती (Rahul Gandhi on Rajeev Satav Dies)

Rajeev Satav Death | गांधी कुटुंबाचा निष्ठावान नेता, राहुल गांधींचा विश्वासू मोहरा, कोण होते राजीव सातव?
Rahul Gandhi Rajeev Satav
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळला होता. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. (Congress Rahul Gandhi reliable leader Rajeev Satav Dies after Corona)

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि त्यांच्या सर्वतोपरी उपचार करण्यासही सांगितलं होतं.

राजीव सातव यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्यामुळे ते पुन्हा कार्यरत होतील, असा विश्वास त्यांचे सहकारी व्यक्त करत होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

कोण होते राजीव सातव?

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राज्यसभेवर वर्णी

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.

संबंधित बातम्या :

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी

राजीव सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो व्हायरस नेमका काय? धोका कुणाला?

(Congress Rahul Gandhi reliable leader Rajeev Satav Dies after Corona)