AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | स्पीकरच्या निवडणुकीवेळी राज्यपालांनी प्रलंबित याचिकेचं कारण दिलं.. मग आज विशेषाधिकार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल

राज्यपालांचं हे वर्तन म्हणजे न्यायिक व्यवस्थेचं उल्लंघन असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

Nana Patole | स्पीकरच्या निवडणुकीवेळी राज्यपालांनी प्रलंबित याचिकेचं कारण दिलं.. मग आज विशेषाधिकार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रेस, आमचाच विरोधी पक्षनेता व्हावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणीImage Credit source: ANI
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 29, 2022 | 1:28 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला राज्यपालांनी उद्या म्हणजेच 30 जून रोजी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या (ShivSena) 16 आमदारांवर अपापत्रतेची कारवाई संबंधीची याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme court) प्रलंबित असताना राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश कसे देऊ शकतात, असा सवाल काँग्रेसने केला आहे. राज्यपालांचं हे वर्तन असंवैधानिक असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या याच आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक एका प्रलंबित याचिकेचं कारण दाखवत राज्यपालांनी लांबवली आहे. मग आता शिवसेना आमदारांची याचिकाही सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणीचा आदेश राज्यपाल कसा देऊ शकतात, असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

राज्यपालांनी आडकाठी केल्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे, असा आरोप करताना नाना पटोले म्हणाले, ‘ विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत हायकोर्टानं भाजपाला फटकारलं होतं. त्यांची अमानत रक्कम जप्त केली होती. हे विधीमंडळाचं कामकाज आहे, आमच्याकडे यायचं नाही, असं हायकोर्टानं म्हटलं होतं. या प्रकरणी भाजप सुप्रीम कोर्टात गेलं आणि तिथे हे प्रकरण पेंडिंग आहे. सरकारकडून राज्यपालांना विनंती केली होती की, स्पीकरची निवडणूक लावायची आहे, परवानगी द्या. तेव्हा राज्यपालांनी लिहून पाठवलं होतं की न्यायिक प्रक्रियेत असल्यामुळे मला काही कारवाई करता येणार नाही. आता आजच्या बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या आदेशातही तीच स्थिती आहे. शिवसेनेनं गटनेता बदलला आहे. आता विधानसभेत व्हिप कुणाचा होईल? एकिकडे राज्यपाल विधानसभा अध्यक्षाबाबत अशी भूमिका घेतलं.. आणि एकाएकी रात्रीतून असं काय झालं की रात्रीतूनच फ्लोअर टेस्टचा निर्णय घेण्यात आला? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.

‘न्यायिक व्यवस्थेचं उल्लंघन’

राज्यपालांचं हे वर्तन म्हणजे न्यायिक व्यवस्थेचं उल्लंघन असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. ते म्हणाले, ‘ कोर्टात 11 जुलैपर्यंत प्रकरण प्रलंबित असताना लगबगीनं या पद्धतीनं त्यांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश काढावेत. हा मोठा चमत्कार आहे. संविधानाच्या आणि न्यायिक व्यवस्थेचं उल्लंघन आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी खेदजनक आहे. राज्यपाल हे भाजपचा अजेंडा लावून धर आहेत. आमचा गटनेता वेगळा असं म्हणणाऱ्या शिंदेंना हा आखाडा विधानभवनात रंगवता येणार नाही. तिथं काय स्थिती होईल, हे सांगता येत नाही, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...