नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात खोक्याला (Khoke)अनन्यसाधारण महत्व आले आहे. खोके सरकारवरुन पावसाळी अधिवेशनात विरोधक (Opposition) आणि सरकारमध्ये (Government) वाद टोकाला पोहचला होता. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात खोक्यावरुन शाब्दिक चकमक सुरुच आहेत. त्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या (Chandrakant Khaire) एका वक्तव्यावरुन पुन्हा वाद उफळला आहे. खैरेंच्या खोकेप्रकरणावरुन त्यांचे डोके तपासावे लागेल, अशी जहरी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे.