AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीच्या बैठकीत वादाची ठिणगी, राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर, मंत्री म्हणाले…

काँग्रेसमध्ये आणखी फूट पडणार आहे अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी संपर्कात आहेत. राष्ट्रवादी सोबतच भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विकासाचा विचार करून प्रवेश होणार आहेत.

महायुतीच्या बैठकीत वादाची ठिणगी, राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर, मंत्री म्हणाले...
EKNATH SHINDE, AJIT PAWAR AND DEVENDRA FADNAVIS Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 14, 2024 | 8:56 PM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार | 14 जानेवारी 2024 : येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महायुतीने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ नेते एकत्र आलो आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा, तालुका पातळीवरील नेते एकत्र यावे यासाठी राज्यात महायुतीच्या सभा घेणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी या सभांना उपस्थित राहणार आहोत असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले होते. मात्र, त्यांचे हे विधान हवेत विरत नाही तोच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे.

नंदुरबारमध्ये राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक घेण्यात आली. शहरातील नाट्यमंदिर सभागृहात ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीकडे भाजप खासदार, आमदार, मंत्री आणि शिंदे गटाच्या सर्वच आजी माजी पदाधिकारी यांनी पाठ फिरविली. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गटाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली होती.

मंत्री अनिल पाटील यांनी या बैठ्कीनंतर पत्रकाराची संवाद साधताना चौफेर फटकेबाजी केली. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला मला माहित नाही. जो निवडून येणार असाच उमेदवार लोकसभेसाठी वरिष्ठ देतील. ज्या पक्षाच्या उमेदवार निवडून आला आहे त्याच पक्षाला उमेदवार दिली जाईल असे मला वाटतं. राज्यात 48 पेक्षा 45 प्लस जागा कशा निवडून येतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत असे मंत्री अनिल पाटील म्हणाले.

काँग्रेसचे माजी खासदार आणि मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी फूट पडणार आहे अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी संपर्कात आहेत. राष्ट्रवादी सोबतच भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विकासाचा विचार करून प्रवेश होणार आहेत. येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अनेक धक्के बसताना दिसतील असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा निकाल लागला. आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचा न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे. आमच्याकडे संख्याबळ अधिक आहे. ते कागदावर सिद्ध झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि अपात्रतेच्या येणारा निर्णय आमच्या बाजूने लागणार असा आत्मविश्वास आहे असे अनिल पाटील यांनी सांगितले.

संजय राऊत किस गली का गलबिला है…

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पक्ष चोरीचा आरोप केला. संजय राऊत किस गली का गलबिला है. संजय राऊत म्हणतात दुसऱ्यांचे पक्ष चोराला निघाले आहेत. पहिले आपण स्वतःच्या पक्ष सांभाळ नंतर दुसऱ्या पक्षांचा विचार कर. तुमच्या पक्षामध्ये तुमचे ठिकाण नाही. त्यामुळे आता आपल्याला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे घर जाळत फिरणार आहेत. ज्यांच्याकडे धनुष्यबाण आणि घड्याळ आहे त्यांच्याच हा पक्ष आहे. संजय राऊत आम्हाला सल्ला देत आहेत नवीन पक्ष काढा. मात्र आपण आपला पक्ष सांभाळा आणि मोठा करून दाखवा. ते सिद्ध झाल्यावर दुसऱ्यांवर बोलण्याच्या अधिकार तुम्हाला राहणार असा हल्लाबोल त्यांनी राऊत यांच्यावर केला.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.