Corona Vaccine : कोरोना लसीचा तुटवडा, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी!

Corona Vaccine : कोरोना लसीचा तुटवडा, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी!
कोरोना लसीच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला फटका बसल्याचं सांगत ठाकरे सरकावर जोरदार टीका केलीय. आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसनं पलटवार केलाय.

सागर जोशी

|

Apr 07, 2021 | 10:50 PM

मुंबई : राज्यात पुढील 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केलीय. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला फटका बसल्याचं सांगत ठाकरे सरकावर जोरदार टीका केलीय. आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसनं पलटवार केलाय. (Allegations between the Center and the Maharashtra government over the shortage of corona vaccine)

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामना

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचं म्हटलंय. त्यावर एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केलीय. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक परिपत्रकच टाकलंय.

लस तुटवड्याचे आरोप निराधार – डॉ. हर्षवर्धन

‘गेल्या काही दिवसांत मी महाराष्ट्र सरकारच्या काही नेत्यांनी लसींच्या तुटवड्याबाबत आणि अपुऱ्या पुरवठ्यावरुन केलेली वक्तव्य ऐकली. हा कोरोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला आलेलं अपशय झाकण्यासाठीचा प्रयत्न आहे. याबाबत जबाबदारीनं वागण्यात महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश अनाकलनीय आहे. अपयश झाकण्यासाठीच लोकांमध्ये भीती निर्माण केली जातेय. लसींच्या पुरवठ्याविषयी सर्व माहिती घेतली जात आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारांनाही माहिती दिली जात आहे. त्यामुळे लस तुटवड्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत’, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय.

डॉ. हर्षवर्धन यांना महाराष्ट्र काँग्रेसचं प्रत्युत्तर

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांना आता महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच! अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायला सुरवात केली आहे’, असा पलटवार महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलाय.

‘आपल्या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लसीकरणाची आकडेवारी देताना जाणीवपूर्वक महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाब या बिगर भाजप शासित राज्यांची सविस्तर आकडेवारी दिली. पण हे करत असतानाच इतर भाजप शासित राज्यांची विस्तृत आकडेवारी देण्यास ते जाणीवपूर्वक विसरले!’ असा टोलाही महाराष्ट्र काँग्रेसनं लगावला आहे.

संबंधित बातम्या :

‘कोरोना लसींबाबत केंद्राशी बोला, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा’, फडणवीसांचा खोचक सल्ला

25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह राजेश टोपे यांच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या, वाचा सविस्तर

Allegations between the Center and the Maharashtra government over the shortage of corona vaccine

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें