AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…त्यानंतर महाराष्ट्राला कळेलच खोके कोणी घेतले अन् विचारासाठी कोण लढतो, दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधाला आहे.

...त्यानंतर महाराष्ट्राला कळेलच खोके कोणी घेतले अन् विचारासाठी कोण लढतो, दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा
Image Credit source: tv9
| Updated on: Oct 15, 2022 | 2:13 PM
Share

गिरीश गायकवाड,टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई:  बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधाला आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटाचा उल्लेख खोके सरकार आणि गद्दार असा केला जातो. या टीकेला दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांत मी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या महाराष्ट्राला कळेल चांगलं कोण आहे आणि वाईट कोणं आहे ते, खोके कोण घेतं आणि विचारासाठी कोण लढतं असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच धनुष्यबाण हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हालाच मिळणार असा दावा देखील केसरकर यांनी केला आहे.

केसरकर यांनी नेमकं काय म्हटलं ?

दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. अनेक जण वाईट पद्धतीने टीका करतात पण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. मी दोनच दिवसांत पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या महाराष्ट्राल कळेल खोके कोणी घेतले आणि विचारासाठी कोण लढत आहे. वाईट कोण आणि चांगलं कोण असं  केसरकर यांनी म्हटलं आहे.

शिंदे गट, ठाकरे गट पुन्हा आमने-सामने?

दरम्यान दसरा मेळाव्याप्रमाणेच दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरून देखील शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यावर देखील दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी आमच्यावर आरोप करणं योग्य नाही. आम्ही तर फक्त बाळासाहेबांचे जे विचार आहेत, ज्या पंरंपरा आहेत त्या पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?