Deglur by-Election : ‘धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशा लढाईत भाजपचा विजय निश्चित’, सुभाष साबणेंचा दावा

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असा दावा सुभाष साबणे यांनी केलाय. तसंच ही पोटनिवडणूक धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी आहे. त्यात भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सुभाष साबणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.

Deglur by-Election : 'धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशा लढाईत भाजपचा विजय निश्चित', सुभाष साबणेंचा दावा
subhash sabane


नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. शिवसेनेला धक्का देत भाजपनं माजी आमदार सुभाष साबणे यांना आपल्या गोटात घेतलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष साबणे यांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर झालेल्या भाजपच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. तर सुभाष साबणे यांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केलाय. (BJP candidate Subhash Sabane confident of victory in by-elections)

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असा दावा सुभाष साबणे यांनी केलाय. तसंच ही पोटनिवडणूक धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी आहे. त्यात भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सुभाष साबणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय. सुभाष साबणे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेड दौऱ्यावेळीच सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, खोतांचा दावा

विधानसभा गाजवणारा नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे. मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार. तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. त्यांनी पीक विम्याचे चार हजार कोटी रुपये वाटून खाल्ले. अतिवृष्टीनंतर आता आम्हाला हे काय देणार? मला खात्री आहे हे काही देणार नाहीत, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

‘मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले’

अशोक चव्हाण हा भाग्यवान माणूस, पण सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी चव्हाणांना लगावलाय. सरकारमधील लोक नोटा मोजून थकली. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचं, असं आवाहन खोत यांनी देगलूरमधील मतदारांना केलंय.

चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला खोचक टोला

आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच. आम्ही हे राज्य विजयी केलं नव्हतं. मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

इतर बातम्या :

शिवसैनिक रडका नसतो, लढणारा असतो, सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेल्या सुभाष साबणेंवर संजय राऊतांचा हल्ला

‘..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

BJP candidate Subhash Sabane confident of victory in by-elections

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI