NDAतून बाहेर पडलेली शिवसेना आता UPAमध्ये जाणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. तसंच राहुल गांधी यांनी शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धतीबाबत जाणून घेतल्याचंही संजय राऊत म्हणाले होते. याबाबत विचारलं असता उद्या शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएमध्ये सहभागी झाली तर आश्चर्य वाटणार नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

NDAतून बाहेर पडलेली शिवसेना आता UPAमध्ये जाणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
chandrakant patil
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 4:06 PM

मुंबई : राज्यात भाजपची साथ सोडून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर केंद्रातील सत्तेतूनही सेना बाहेर पडली. इतकंच नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधूनही बाहेर पडली. या घडामोडीनंतर आता शिवसेनेची काँग्रेससोबत जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. तसंच राहुल गांधी यांनी शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धतीबाबत जाणून घेतल्याचंही संजय राऊत म्हणाले होते. याबाबत विचारलं असता उद्या शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएमध्ये सहभागी झाली तर आश्चर्य वाटणार नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. पाटील यांनी आज राजधानी दिल्लीत नारायण राणे, भागवत कराड, कपील पाटील आणि भारती पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. (Chandrakant Patil’s big statement about ShivSena and UPA, Criticism of CM Uddhav Thackeray)

दरम्यान, मुख्यमंत्री आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. त्याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोले लगावले. मुख्यमंत्री उशीरा का होईना पण जनतेला संबोधित करत आहेत. ते कुठून बोलतात, कसे बोलतात यापेक्षा ते बोलत आहेत हे महत्वाचं आहे. राज्यातील जनता, व्यापारी त्रस्त आहेत. व्यापारी वर्गावर तर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. काम केल्याशिवाय अनेकांच्या घरात चूल पेटत नाही. त्यामुळे आता घरी बसा म्हणल्यावर कुणीही ऐकणार नाही. त्यामुळे उगाच बागुलबुवा उभा न करता मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्या असं सांगावं, असंही पाटील यावेळी म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा

महाराष्ट्रातील भाजपचे इतरही महत्त्वाचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याची चर्चा आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष आणण्याची चर्चाही जोर धरत आहे. पाटील यांना खरोखरच बदललं जाणार आहे का? पाटील यांना बदलण्यात येणार असल्याची अचानक चर्चा का सुरू झालीय? या सर्व प्रश्नांचा घेतलेला वेध.

पाटील काय म्हणाले?

भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

चंद्रकांत पाटलांना बदलण्याची चर्चा का होतेय?; खरंच बदललं जाणार का?

Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, मुख्यमंत्री काय बोलणार?

Chandrakant Patil’s big statement about ShivSena and UPA, Criticism of CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.