
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. विधानसभेच्या 70 जागांपैकी 48 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर 22 जागांवर आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे. या निकालानंतर तब्बल 12 वर्षाची आपची सत्ता गेली आहे. तर 27 वर्षानंतर भाजपचं दिल्लीत कमबॅक झालं आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही खातं उघडता आलं नाही. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि आपचा चेहरा असलेले अरविंद केजरीवालच पराभूत झाले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. तर मुख्यमंत्री आतिशी यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. यावरून आपची दिल्लीतील अवस्था काय झाली याची कल्पना येते. पण दिल्लीत आपचा इतका दारूण पराभव कसा झाला? यामागची कारणं काय आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश. निकाल कसे होते… दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 तारखेला मतदान झालं. आणि 8 फेब्रुवारी रोजी निकाल आला. यातील 48 जागांवर भाजप तर 22 जागांवर आपचा विजय झाला. आपने 2015मध्ये 67 आणि 2020मध्ये...