दिल्लीत राडा; महापौर निवडणुकीत धक्काबुक्की, AAP आणि भाजप आमने-सामने, काय घडतंय?

आज निवडणुकीच्या सुरुवातीलाच आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला.

दिल्लीत राडा; महापौर निवडणुकीत धक्काबुक्की, AAP आणि भाजप आमने-सामने, काय घडतंय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 1:56 PM

नवी दिल्लीः महानगर पालिका निवडणुकीत (MCD Election) भाजपाची १५ वर्षांची सत्ता उलथवून देत आम आदमी पार्टी (Aam Admi Party) सत्तेत आली.  मात्र आज महापौर आणि स्थायी समिती सदस्य निवडणुकीच्या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. आज महापालिकेच्या सभागृहात महापौर निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. आम आदमी पार्टी आणि भाजप या दोन्ही तगड्या पक्षाने या पदावर दावा केला आहे. कामकाजाच्या सुरुवातीलाच आप आणि भाजपचे नगरसेवकांमध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला.

250 सदस्यांच्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने 134 वॉर्डांमध्ये विजय मिळवला तर भाजपने 104 जागा जिंकल्या. काँग्रेसला 25 ठिकाणी सत्ता मिळाली.

आज जवळपास महिनाभरानंतर महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक होत आहे. बहुमतात नसूनही भाजपने महापौर पदावर ऐनवेळी दावा ठोकल्याने ही निवडणूक अधिकच रंगात आली आहे.

आम आदमी पार्टीने आज नाम निर्देशित सदस्यांच्या शपथविधीला विरोध केला. आपच्या नगरसेवकांनी पिठासीन अधिकाऱ्याला घेराव घालून धक्का-बुक्की केली. यावेळी भाजप सदस्यांशीही बाचाबाची झाली. सध्या ही निवडणूक प्रक्रिया तहकूब करण्यात आली.

महापौर पदासाठी आम आदमी पार्टीने दोन तर भाजपने एक नामांकन अर्ज भरला आहे.

महापौर पदाच्या निवडणुकीत 273 सदस्य मतदान करणार आहेत. बहुमतासाठी 133 चा आकडा आवश्यक आहे.  आज जवळपास महिनाभरानंतर महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक होत आहे. बहुमतात नसूनही भाजपने महापौर पदावर ऐनवेळी दावा ठोकल्याने ही निवडणूक अधिकच रंगात आली आहे.

महापौर पदासाठी आम आदमी पार्टीने दोन तर भाजपने एक नामांकन अर्ज भरला आहे.

आज कामकाजाच्या सुरुवातीलाच आम आदमी पार्टी आणि भाजपने परस्परांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मतदानानापूर्वीच काँग्रेसच्या नगरसेवकांनी वॉक आउट केलं. यावरून आम आदमी पार्टीने जोरदार हल्ला चढवला. भाजप आणि काँग्रेसदरम्यान बंद खोलीत चर्चा झाली आणि काँग्रेस भाजपाला समर्थन देणार असल्याचं ठरल्याचा आरोप आपने केला.

Non Stop LIVE Update
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.