Who is Maharashtra new CM : देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा 1 जुलैला शपथविधी? शिंदे गटाला किती मंत्रीपदे? सत्तेचा फॉर्म्यूला जाणून घ्या….

1 जुलैला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार असून सत्तेचा फॉर्म्यूला देखील तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाच सत्तेचा फॉर्म्यूला 'टीव्ही9'च्या हाती लागलाय. तो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Who is Maharashtra new CM : देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा 1 जुलैला शपथविधी? शिंदे गटाला किती मंत्रीपदे? सत्तेचा फॉर्म्यूला जाणून घ्या....
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 11:10 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आलाय. उद्या भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती आहे. तर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सूत्र सांगतात. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मुंबईत बोलावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीका टिप्पणी आणि आरोपांमुळे बंडखोरांनी वेगळी वाट पकडली. आता 1 जुलैला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार असून सत्तेचा फॉर्म्यूला देखील तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाच सत्तेचा फॉर्म्यूला टीव्ही9च्या हाती लागलाय. तो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सत्तेचा नवा फॉर्म्यूला काय?

बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून सरकार बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सत्तेचा फॉर्म्यूला देखील बनला असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलंय. तो फॉर्म्यूला काय आहे. हे जाणून घ्या..

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात शिंदे गटाला काय?

  1. शिंदे गटाला भाजपची ऑफर
  2. उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिदेंना
  3. हे सुद्धा वाचा
  4. आठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद
  5. पाच आमदारांना राज्य मंत्रीपद

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात भाजपला काय?

  1. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद
  2. भाजपचे 29 आमदार मंत्री बनतील
  3. अपक्ष आमदारांनाही मंत्री पदे

कोर्टाचा ‘मविआ’ला झटका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा झटका बसलाय. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला. त्यामुळे उद्याच ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावं लागणार होतं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आजच राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं.

शेवटच्या भाषणात मुख्यमंत्री काय म्हणालेत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं की, ‘मला मुख्यमंत्रीद सोडण्याची खंत अजिबात नाहीय. मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा होती, नव्हती तुम्हाला माहती आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंब माहीत आहे. आम्ही हिंदूंसाठी काम करतो. मी सगळ्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. तुम्ही प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. मी घाबरणारा नाही. उद्या कारण नसताना शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचं धनी व्हायचं नाहीये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.