अधिकाऱ्यांमधील समन्वयाचं काम राजकीय नेतृत्त्वाचं, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंकडे बोट

| Updated on: May 07, 2020 | 6:29 PM

मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात समन्वय घडवण्याचं काम राजकीय नेतृत्वाचे असतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Thackeray government leadership).

अधिकाऱ्यांमधील समन्वयाचं काम राजकीय नेतृत्त्वाचं, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंकडे बोट
Follow us on

मुंबई :मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात समन्वय घडवण्याचं काम राजकीय नेतृत्वाचं असतं (Devendra Fadnavis on Thackeray government leadership). महत्त्वाचे निर्णय घेताना राजकीय नेतृत्व दिसलं पाहिजे. प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री यांच्यात समन्वय घडत नाही. तो घडवला पाहिजे, ही माझी मागणी आहे”, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे बोट दाखवलं आहे (Devendra Fadnavis on Thackeray government leadership).

प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री यांच्यात समन्वय साधला जात नसल्याचं समोर आलं आहे. काही मंत्र्यांनी काल (6 मे) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांची तक्रार केली. समन्वयाचा अभाव, परस्परविरोधी निर्णय यांबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच गोष्टीचा धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या नेतृत्वावर भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (7 मे) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“मुंबईची परिस्थती गंभीर आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची शंका निर्माण होत आहे. मुंबईकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले राजकारण करु नये. आम्ही राजकारण करत नाहीत. उलट त्यांच्याबरोबर असलेली लोक काय करत आहेत ते पाहावं, काहीही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवणं योग्य नाही”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

भावना दुखावल्या गेल्या, सर्वांची दिलगिरी, संभाजीराजेंच्या मागणीनंतर फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त

अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला

…म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर

सरकारच्या कामावर समाधानी आहात का? राज ठाकरे म्हणतात….

परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल