परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे

महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray on All Party Meeting) केली. 

परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली (Raj Thackeray on All Party Meeting)  होती. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाला अनेक प्रकारच्या सूचना केल्या. राज्यातील परप्रांतीय बाहेर गेल्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण झाला आहे. या संधी राज्यातील तरुणांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परप्रांतीय बाहेर गेले आहे. त्यामुळे (Raj Thackeray on All Party Meeting) ते परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात घेऊ नका. कारण संबंधित राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललयं, हे आपल्याला माहिती नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

“ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील. त्यावेळी त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याचवेळी त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ते वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो,” अशीही सूचना राज ठाकरेंनी दिली.

“परप्रांतीय गेल्यामुळे महाराष्ट्रातील कारखाने उद्योगधंदे बंद होऊ नये, यासाठी राज्यातील तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध  असलेल्या ठिकाणापर्यंतची माहिती पोहोचवा. आपल्याकडे अनेकदा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी त्यांना रोजगाराबाबत माहिती नसते. त्यामुळे जर रोजगार उपलब्ध असले तर ते या मुला-मुलींना कळवावे.”

“भाजी विकण्यापासून इतर अनेक ठिकाणचे लोक बाहेर गेलेले आहे. ती संधी महाराष्ट्र शासनाकडे आहे, ती संधी घालवू नये,” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“प्रत्येक ठिकाणी माणुसकी माणुसकी असं नसतं. तुम्ही इतर ठिकाणी गेल्यावर ते तुमच्याकडे माणुसकी म्हणून बघत नाहीत. ते यंत्रणांप्रमाणे काम करतात,” असेही राज ठाकरेंनी यावेळी (Raj Thackeray on All Party Meeting) सांगितले.

संबंधित बातम्या :

LIVE – सर्वपक्षीय बैठकीला देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची हजेरी

आधी पत्र, आता अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, उद्धव ठाकरे म्हणतात…

Published On - 3:57 pm, Thu, 7 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI