...म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित होते. 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं होतं. (Raj Thackeray without Mask for all party meet with CM Uddhav Thackeray in Mantralaya)

...म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चेहऱ्याला मास्क न लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही, असं मोघम उत्तर देत, राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली. (Raj Thackeray without Mask for all party meet with CM Uddhav Thackeray in Mantralaya)

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्क लावण्याचा नियम असूनही राज ठाकरे यांनी तो का पाळला नाही, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी केवळ स्मितहास्य केलं. अखेर, ‘याचं कारण म्हणजे सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही’ असं उत्तर देत राज ठाकरे निघाले. या बैठकीला उपस्थित राहिलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही मास्क लावला होता.

हेही वाचा : परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे

खरं तर मास्क नसल्यास मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही, अशा कडक सूचना ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या आहेत. मंत्रालयात अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरानाचा संसर्ग वाढत असतानाच मुंबई सर्वात मोठा हॉटस्पॉट झाला आहे. घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही, तर नियमभंग करणाऱ्यांना थेट बेड्या ठोकण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

हेही वाचा : लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित होते. 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं होतं. (Raj Thackeray without Mask for all party meet with CM Uddhav Thackeray in Mantralaya) राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर मंत्रालयात उपस्थित होते.

हेही वाचा : सरकारच्या कामावर समाधानी आहात का? राज ठाकरे म्हणतात….

परप्रांतीय कामगारांसाठी परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये, अशी सूचना राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी सरकारला लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनबाबत विचारणा करत 9 सूचना दिल्या.

(Raj Thackeray without Mask for all party meet with CM Uddhav Thackeray in Mantralaya)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *