भावना दुखावल्या गेल्या, सर्वांची दिलगिरी, संभाजीराजेंच्या मागणीनंतर फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्वीटमध्ये फडणवीसांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता (Devendra Fadnavis apologies for tweet on Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj)

भावना दुखावल्या गेल्या, सर्वांची दिलगिरी, संभाजीराजेंच्या मागणीनंतर फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त

मुंबई : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा अनादर करणारे ट्वीट केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी फडणवीसांकडे माफीची मागणी केली होती. (Devendra Fadnavis apologies for tweet on Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj)

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्वीटमध्ये फडणवीसांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविषयी संतापाची लाट उमटली होती.

त्यानंतर, “माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. फडणवीसांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी” अशी मागणी खासदार संभाजीराजेंनी केली. त्याला उत्तर देत, ‘भावना दुखावल्या गेल्या त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो’, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो’ अशा शब्दात फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली.

हेही वाचा : राज ठाकरे-फडणवीसांसह 18 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली

(Devendra Fadnavis apologies for tweet on Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *