जाता जाता फडणवीस सिंचन घोटाळ्यावर बोलून गेले

| Updated on: Nov 26, 2019 | 5:07 PM

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अवघ्या 79 तासांत राजीनामा (Devendra fadnavis on irrigation scam)  दिला.

जाता जाता फडणवीस सिंचन घोटाळ्यावर बोलून गेले
Follow us on

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अवघ्या 79 तासांत राजीनामा (Devendra fadnavis on irrigation scam)  दिला. बहुमत चाचणीतील पराभव टाळण्यासाठी राजीनामा देत आहे असे सांगत फडणवीसांनी राजीनामा दिला. याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (Devendra fadnavis on irrigation scam) होता. त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला. अधिकृत पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी याबाबतची अधिकृत घोषणा (Devendra fadnavis on irrigation scam) केली.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल सिंचन घोटाळ्यातील जवळपास 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांना सिंचन घोटाळ्याच्या चौकशीबाबत विचारले असता ते म्हणाले. “गेल्या 5 वर्षात आम्ही सिंचन घोटाळ्याची चौकशी केली. आता पुढील चौकशी कोर्ट करत आहेत.” असे ते (Devendra fadnavis on irrigation scam) म्हणाले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सिंचन घोटळ्याची उघड चौकशी बंद करण्याचे आदेश काल देण्यात आले (Ajit pawar get relief irrigation scam) होते. सिंचन घोटाळ्यातील जवळपास 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्याचे आदेश दिले होते. यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र त्यानंतर सिंचन घोटाळ्यातील ज्या 9 प्रकरणांची चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांचा अजित पवार यांच्याशी काहीही संबंध नाही. अशी माहिती महाराष्ट्र लाचलुचपत विभागाचे डीजी परमबीर सिंग यांनी दिली (Devendra fadnavis on irrigation scam) होती.

फडणवीसांकडून शिवसेनेवर टीकास्त्र

दरम्यान फडणवीसांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर अनेक ताशेरे ओढले. “शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले नसतानाही शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. मुख्यमंत्रिपद देणार नसाल, तर आम्ही कोणासोबतही जाऊ अशी धमकी त्यांनी दिली,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“आम्ही अनेक दिवस त्यांची वाट पाहिली. मात्र त्यांनी आमच्याशी चर्चा करण्याऐवजी ते कांग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते. मातोश्रीमधून कधीही बाहेर न पडणारे लोक हॉटेलमध्ये जाऊन चर्चा करु लागले,” असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

फडणवीसांच्या तिन्ही पक्षांच्या सरकारला शुभेच्छा

यावेळी त्यांनी सत्तास्थापना करण्यासाठी अजित पवार आमच्याकडे पत्र घेऊन आले होते. म्हणून आम्ही सत्तास्थापना केली होती. असा दावाही फडणवीसांनी केली. मला विश्वास आहे की हे तिन्ही पक्ष चांगले सरकार चालवतील. त्यांना माझ्या शुभेच्छा. भाजप हटावचा अजेंडा घेऊन हे सगळे लोक सत्तेसाठी एकत्र आले (Devendra fadnavis on irrigation scam) आहेत.

भाजप विरोधी पक्षात बसणार

भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून त्यांना न्याय देण्याचे काम करु असेही फडणवीस यावेळी म्हणाले. दोन चाकाचे सरकार वेगाने धावते. पण तीन चाकाच्या सरकारची अवस्थाही वाईट होणार आहे. रिक्षा तीन चाके असतात. जर ती चाक तिन्ही वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागली तर तशीच अवस्था या सरकारची होईल असेही ते म्हणाले.