धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, महिलेचे खळबळजनक आरोप, सर्वात मोठी बातमी समोर

धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत, रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, या आरोपांमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, महिलेचे खळबळजनक आरोप, सर्वात मोठी बातमी समोर
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 8:13 PM

मोठी बातमी समोर येत आहे, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी ज्यांचा उल्लेख केला होता, त्या रंजना नागपूरकर यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला आहे. पतीला पुन्हा नोकरीमध्ये रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पैसे मागितले, मी 17 लाख दिले, असा दावा रंजना नागपूरकर यांनी केला आहे. दरम्यान  पतीच्या मृत्यूनंतर पैसे परत मागण्यासाठी गेले  असता धनंजय मुंडेंसमोरच मला पिस्तूल लावलं, असा आरोप नागपूरकर यांनी केला आहे, या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाल्या नागपूरकर? 

माझ्याकडे 17 लाखांची मागणी केली, तेव्हा मी परळीत त्यांच्या घरी गेले, त्यांच्या अंगणात गेले. धनंज मुंडे तिथे हजर होते. त्यानंतर ते म्हणाले की जा तुमचं काम आता लेगच होतंय. पण मला जेव्हा कळालं की माझे पैसे तर गेलेच पण आता माझं काम देखील होत नाहीये, तेव्हा मी पुन्हा परळीत गेले. त्यावेळी तिथे निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे हे देखील घरी होते. तेव्हा त्यांची बायको आणि आई देखील घरी होती. पण तेव्हा मला धनंजय मुंडेंसमोरच माझ्या गळ्याला बंदूक लावण्यात आली, तू पु्न्हा आली तर तुला गाडून टाकू, कोणाला पत्ता देखील लागणार नाही, असं त्यांनी म्हटलं.  त्यामुळे मी पुन्हा गेले नाही, मी जाणं बंद केलं असा आरोप नागपूरे यांनी केला आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवाडे यांनी नागपूरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.  महाराष्ट्रात अनेक कुत्रे झाले असून धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेऊन दुकान चालवतात, धनंजय मुंडे साहेबांचे नाव विनाकारण बदनाम करू नका. रंजनाताई तुम्ही बोललात तर आता आणखी काही कुत्रे बोलणार, तुम्ही पैसे दिले म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना दिले नाहीत, तुम्ही बीडला या आपण सत्यता पडताळून पाहू, अशी प्रतिक्रिया या आरोपांवर नाईकवाडे यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us