बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास, अजित पवार भरभरुन बोलले

"याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले".

बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास, अजित पवार भरभरुन बोलले
Ajit Pawar, Dhananjay Munde
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 2:11 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी कोरोना लसीकरण, सीरमची आग, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेप्रकरण (Ajit Pawar on Dhananjay Munde), राजकारण्यांचे पक्षप्रवेश अशा विविध विषयांवर भाष्य केलं. अजित पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणावर बोलण्यासाठी विशेष वेळ घेतला.  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्याबाबत अजित पवार भरभरुन बोलले.(Ajit Pawar on Dhananjay Munde)

याबाबत अजित पवारांना विचारलं असता, ते म्हणाले, “याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली. असे आरोप करणारे काही तथ्य समोर आले नाही”

अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा. आज माझे धनंजयसोबत बोलणं झाले नाही. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करु नये, असं अजित पवारांनी नमूद केलं.

.. तर माणूस एका झटक्यात बदनाम होतो

एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करु लागला, तर त्याचं नाव लोकांत चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं. असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलनं करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी ही मागणी केली, धनंजयसंबंधात वक्तव्य केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवार यांनी केला.

धनंजयने संधीचं सोनं केलं

धनंजयला राष्ट्रवादीने संधी दिली, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. संधीचं सोनं केलं. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताने निवडून आले. पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला. पवारांनी महत्त्वाच्या खात्याचा भार दिला. ते काम करत होते. बहुजन समाजातून आलेला नेता. त्यांच्या मागे कुटुंब अक्षरश: पाच सहा दिवस अडचणीत आले. डिस्टर्ब झाले. याला कुणी वाली आहे की नाही. मुंडे कुटुंबाला ७-८ दिवस भयंकर त्रास सहन करावा लागला. राष्ट्रवादीला प्रश्न विचारले, राजीनाम्याची मागणी केली. मात्र शरद पवारांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ द्या असं आधीच सांगितलं होतं, असं अजित पवारांनी नमूद केलं.

VIDEO : अजित पवार धनंजय मुंडेंबाबत भरभरुन बोलले

(Ajit Pawar on Dhananjay Munde)

संबंधित बातम्या  

मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन आणि सांगेन : अजित पवार

भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजितदादा म्हणाले, ‘वारं बदललं’!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.