AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर अभी जिंदा है… धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत 50 फुटी बॅनर्स,चर्चाच चर्चा!

विशेष म्हणजे या रॅलीत केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, तसेच मुंबईतलं ढोल पथक मागवण्यात आलंय. तर खास बीएमडब्ल्यू गाडीतून त्यांची मिरवणूक निघणार आहे.

टायगर अभी जिंदा है... धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत 50 फुटी बॅनर्स,चर्चाच चर्चा!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 11, 2023 | 10:17 AM
Share

संभाजी मुंडे, परळी (बीड): राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मुंबईत उपचार घेतल्यानंतर पहिल्यांदाच परळीत (Parali) येत आहेत. या निमित्त त्यांच्या समर्थकांनी मुंडे यांचं जोरदार स्वागत करण्याचं ठरवलंय. उद्या रविवारी धनंडय मुंडे यांचं परळीत आगमन होतंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळीला अक्षरशः स्वागत नगरी करून टाकलंय. टायगर अभी जिंदा है… असे बॅनर्स येथे जास्त लक्ष वेधून घेत आहेत. तर मुंडे यांचं ज्या मार्गावरून आगमन होणार आहे, तेथे मोठमोठ्या कमानी लावण्यात आल्यात. धनंजय मुंडे, अजित पवार यांचे मोठे कट आऊट्स परळीतील रस्त्यांवर दिमाखात उभे आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा परळीत कार अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आलं होतं.

35 दिवसानंतर परतणार

धनंजय मुंडे यांचा  4 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी परळीत भीषण अपघात झाला होता. या घटनेत त्यांची कार अक्षरशः चक्काचूर झाली होती. तर मुंडे यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता. मुंबईतील बीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी तब्बल 35 दिवसानंतर ते परळीत परतत आहेत. एवढ्या मोठ्या अपघातातून ते सुखरूप बचावले, याचा आनंद कार्यकर्ते साजरा करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी नगरी सजली आहे. त्यांच्या स्वागतासाठी परळी शहरात पन्नास फुटी बॅनर लावण्यात आलेत. टायगर अभी जिंदा है या अशा आशाचे बरेच बॅनर येथे पाहायला मिळतायत. तर परळी शहरातील प्रत्येक प्रवेश द्वाराला कमानीने सजवण्यात आले.

उद्या गहिनीनाथाचं दर्शन

आमदार धनंजय मुंडे उद्या म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता बीड जिल्ह्यात येतील. आधी गहिनीनाथ गडावर जावून दर्शन घेतील. त्यानंतर ते मूळ गावी परळीत येतील. दुपारी 4 वाजता ते परळीत येतील. येथे वैद्यनाथाचं दर्शन घेतील. नंतर पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेतील.

केरळ-तिरूपतीचं बँड पथक, BMW तून मिरवणूक

आमदार धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत भव्य मिरवणूक निघणार आहेत. विशेष म्हणजे या रॅलीत केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, तसेच मुंबईतलं ढोल पथक मागवण्यात आलंय. तर खास बीएमडब्ल्यू गाडीतून त्यांची मिरवणूक निघणार आहे. परळीच्या रस्त्या-रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.