बीड जिल्ह्याची बदनामी सुरु, पंकजांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा आरोप; बीडमधील मुलींच्या जन्मदराबाबतची माहिती चुकीची असल्याचाही दावा

| Updated on: Feb 18, 2022 | 10:40 PM

बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी झाल्याच्या मुद्द्यावरुन आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मुलीच्या जन्मदराबाबत आलेली माहिती चुकीची असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.

बीड जिल्ह्याची बदनामी सुरु, पंकजांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा आरोप; बीडमधील मुलींच्या जन्मदराबाबतची माहिती चुकीची असल्याचाही दावा
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे
Image Credit source: TV9
Follow us on

इंदापूर : स्त्री भ्रूण हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याची (Beed District) मोठी बदनामी झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचं वृत्त आले. कोव्हिड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचं समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय. माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या प्रकरणावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मुलीच्या जन्मदराबाबत आलेली माहिती चुकीची असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.

मुलींच्या जन्मदराबाबत जी बातमी आली आहे ती बातमी करतानासुद्धा सविस्तर माहिती घेऊन बातमी करायला हवी होती. जिल्ह्याची बदनामी करत आहेत. त्याला एखादा जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार असेल, जिल्हाधिकारी जबाबदार असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असतील, पीएससीचे सगळे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना जबाबदार धरायचं. काहीही झालं की बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम सुरु आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

2009 मध्ये जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा मुलींचा जन्मदर हा राज्यात सर्वात कमी होता. या गोष्टीबाबत मनात तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांमार्फत खूप काम मी या विषयावर केलं. जेव्हा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, महिला व बालकल्याण विभागाचा कारभार माझ्याकडे आला तेव्हा पहिली योजना मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जाहीर केली. याचा परिणाम असा झाला की बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला. 1 हजार मुलांमागे 961 मुली असं प्रमाण आलं. हे प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरु झालं त्याच ठिकाणी नेण्याचं काम आताच्या या कारभारामुळं झालं आहे. याचा मी तीव्र निषेध करते, तीव्र नापसंती व्यक्त करते आणि दु:ख व्यक्त करते. बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात पीसीपीएनडीटी कायद्याचं व्यवस्थित पालन न झाल्याचं दिसून येत आहे. मुलींचा जन्मदर कमी झाल्यांचं दिसून येत आहे. याचा अर्थ असा आहे की, मुलींचा जन्म नाकारला जात आहे. जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत आणि यावर कुणाचाही वचक किंवा अंकुश राहिलेला नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.

पंकजांचे बीड जिल्हावासियांना आवाहन

‘मी माझ्या बीड जिल्हा वासियांना आवाहन करते की, जसा आपण बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेला खूप छान प्रतिसाद दिला, तसा प्रतिसाद पुन्हा द्या. यात जागृती करणं गरजेचं आहे. त्याच सर्वांनी भाग घ्या. बीड जिल्ह्याचं हे चित्र कधीही आपल्याला दिसायला नको यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत’, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं.

बीड जिल्ह्यातील 1 हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर नेमका किती?

अंबाजोगाई- 951
आष्टी- 1003
बीड- 954
धारूर- 1040
गेवराई- 905
केज- 888
माजलगाव- 929
परळी- 903
पाटोदा- 764
शिरुर कासार- 848
वडवणी- 1104

इतर बातम्या :

Photo : ‘समाधीचे दर्शन घेऊन अभिमानाने ऊर भरून आला’ अमोल कोल्हेंची होदीगेरीमधील शहाजीराजेंच्या समाधीस्थळाला भेट

GOLD PRICE TODAY: महाराष्ट्रात पन्नास हजारी ‘गोल्डन’ डंका; मुंबईत सोनं महागलं, जाणून घ्या आजचे भाव