AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराज सुरतला गेले होते म्हणून मीही गेलो, मला वाटलं… भरत गोगावले यांची तुफान टोलेबाजी

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आजही विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. आज तीन नेत्यांची उलटतपासणी करण्यात आली. तिन्ही नेते शिंदे गटाचे होते. खासदार राहुल शेवाळे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार भरत गोगावले यांची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी भरत गोगावले यांनी मिश्किल उत्तरे दिल्याने सर्वांनाच हसू फुटले. गोगावले यांना दिवसभरात 66 प्रश्न विचारण्यात आले.

शिवाजी महाराज सुरतला गेले होते म्हणून मीही गेलो, मला वाटलं... भरत गोगावले यांची तुफान टोलेबाजी
bharat gogawaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2023 | 9:22 PM
Share

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 12 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आजही विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची उलटतपासणी झाली. यावेळी भरत गोगावले यांना एकूण 66 प्रश्न विचारण्यात आले. यावेळी भरत गोगावले यांनी तुफान फटकेबाजी केली. मार्मिक भाष्य, हाजीरजबाबीपणा आणि टोलेबाजी करत भरत गोगावले यांनी साक्ष दिली. गोगावले यांनी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांना मिश्किल उत्तरे दिली. त्यामुळे एकच खसखस पिकली. त्यांना सुरतला का गेला? असा सवाल करण्यात आला. त्यावर शिवाजी महाराज गेले होते म्हणून मी गेलो, असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे एकच हशा पिकला.

भरत गोगावले यांची उलटतपासणी जशास तशी

वकील देवदत्त कामत – विश्वासदर्शक ठरावावेळी एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या सरकारच्या बाजूने तुम्ही मतदान केले होते, हे खरे आहे का?

आमदार भरत गोगावले – होय.

देवदत्त कामत – भारताच्या संविधानातील शेड्युल्ड 10 नुसार आपण स्वतः वर अपात्रता कारवाई ओढवून घेतली आहे. हे खरे आहे का?

भरत गोगावले – हे खोटे आहे.

कामत – जून 2022 मध्ये तुम्ही सुरतसाठी कधी प्रस्थान केले?

गोगावले – मी 20 जूनला सुरतला प्रस्थान केले.

कामत – तुम्ही सुरतला कसे पोहचला आणि किती आमदार सोबत होते?

गोगावले – मी सुरतला गाडीने गेलो. मी माझ्या गाडीतून एकटाच गेलो.

कामत – 20 जून 2022 रोजी तुम्ही महाराष्ट्रातून जाण्यासाठी सुरत का निवडले?

गोगावले – सुरत चांगले ठिकाण आहे, असे मी ऐकले होते. त्यामुळे तिकडे जाऊन आपण व्यक्तीश: बघावे, म्हणून मी सुरत हे ठिकाण निवडले.

कामत – तुम्ही सुरतला पोहोचला, तेव्हा तिथे इतर आमदार आधीच उपस्थित होते का?

गोगावले – नाही.

कामत – तुम्ही सुरतला पोहोचल्यानंतर बाकीचे आमदार तुमच्या मागून सुरतला पोहोचले का?

गोगावले – मी पहिलाच गेलो, उर्वरित आमदार हे मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे आले.

कामत – जे आमदार तुमच्या मागून सुरतला आले, त्यांना तुम्ही कळवले होते का? की त्यांना तुमच्या आधीच त्या ठिकाणी यायचे माहिती होते?

गोगावले – याबाबत मला माहिती नाही. परंतु मी तिथे गेल्यानंतर, ते तिथे आले आणि त्यांची आणि माझी भेट झाली.

कामत – सुरतमधील एकाच हॉटेलमध्ये सर्व आमदारांनी जमणे, हा योगायोग नव्हता, तर हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता हे बरोबर आहे का?

गोगावले – ते मला माहीत नाही. ते तिकडे कसे आले हे त्यांनाच माहीत असेल. शिवाजी महाराज तिकडे गेले होते, म्हणून मला वाटलं ते चांगलं ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो.

कामत – आपल्या सोबत इतर सर्व आमदार सुरतवरून गुवाहाटीला गेले का?

गोगावले – होय, आम्ही गुवाहाटीला गेलो.

कामत – तुम्ही स्वतःची व्यक्तिगत तिकीट काढले होते का? की कुणी काढली होती.

गोगावले – आम्ही स्वतःच्या खर्चाने गेलो. कामाख्या देवीचे दर्शन स्वतःच्या पैशाने घेणे उचित आहे.

कामत – गुवाहाटी येथे तुम्ही एकत्र एकाच हॉटेलमध्ये थांबला होता, हे खरं आहे का?

गोगावले – होय. आम्ही सर्व मित्र असल्यामुळे एका हॉटेलमध्ये राहिलो.

कामत – तुमच्या कृतीवरून तुम्ही उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेलं सरकार पाडण्याचे काम केले, हे खरं आहे का?

गोगावले – नाही, हे खरं नाही.

कामत – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही मंत्री पदावर होतात का?

गोगावले – नाही.

कामत – माध्यमांमध्ये तुम्ही जून 2022 पासून जुलै 2022 या काळात दिलेल्या बहुतेक मुलाखतींमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे, हे खरं आहे का?

गोगावले – कुठे झालो मी मंत्री? इच्छा प्रत्येकाची असते. (पुन्हा एकदा सभागृहात हसू) नाही. मी अजून कुठे मंत्री झालो आहे.

कामत – गुवाहाटी येथे तुम्ही एकत्र एकाच हॉटेलमध्ये थांबला होता, हे खरं आहे का?

कामत – तुम्हाला मंत्री व्हायचे होते आणि ते केले नाही म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या सरकारचा आमदार म्हणून पाठिंबा काढून घेतला.

गोगावले – हे खोटे आहे.

कामत – आपल्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद क्रमांक एक ते 26 हे चुकीचे आणि निराधार आहेत, हे खरे आहे का?

गोगावले – हे खोटे आहे.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.