AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant Profile | राजकारणातील अचूक टायमिंग साधणारे उदय सामंत यांचा कॅबिनेट पदापर्यंतचा रंजक प्रवास, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Cabinet Minister Uday Samant Profile | राजकारणात अचूक टायमिंग साधणारे उदय सामंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. चला तर त्यांची राजकीय कारकिर्द जाणून घेऊयात.

Uday Samant Profile | राजकारणातील अचूक टायमिंग साधणारे उदय सामंत यांचा कॅबिनेट पदापर्यंतचा रंजक प्रवास, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
पुन्हा साधलं अचूक टायमिंगImage Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 09, 2022 | 2:05 PM
Share

Cabinet Minister Uday Samant Profile | राजकारणात अचूक टायमिंग साधल्यामुळे उदय सामंत (Uday Samant) यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाला (Cabinet Minister) गवसणी घातली. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांनी बहारदार कामगिरी बजावली आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या रुपाने कोकणच्या राजकारणात (Politics) धडाडीचा कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोहचला आहे. कोकणात (Konkan) राणे, गिते, तटकरे यांच्या कारकिर्दीनंतर खऱ्या अर्थाने आपला शिक्का आजमावला असेल तर तो उदय सामंत यांनी. सहसा कोणत्याही वादात न अडकण्याचे त्यांचे कसब आणि नशीब यांनी त्यांना नेहमी साथ दिली आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी पटापट राजकीय पायऱ्या चढल्याच नाहीतर त्यांनी विरोधकांना त्यांचे गहिरे पाणी ही दाखविले आहे. उमद्या कार्यकर्त्याने एखाद्या जिल्ह्यात अल्पावधीतच राजकीय एकछत्री अंमलबजावणीचे सामंत हे अस्सल उदाहरण आहेत. त्यांच्या रुपाने कोकणाला आणि रत्नागिरीला (Ratnagiri)अजून एक कॅबिनेट पद मिळाले आहे.

असा हा राजकीय प्रवास

उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात 2004 ते 2019 या काळात एकहाती पकड बसवली. जिल्ह्यात तळागाळात कार्यकर्त्यांची फौज तयार करणारे फार कमी नेते असतात. त्यात सामंत यांचा वरचा क्रमांक लागतो. रत्नागिरीत त्यांचा एकछत्री अंमल आहे. शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात असला तरी त्यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी पक्षातून झाली होती.  भाजपच्या उमेदवाराचा पराभव करुन त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला.  त्याच भाजपसोबत सत्तेत असताना मंत्रीपद भुषविले.   सेना-भाजपचा मतदारसंघ म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेतृत्व असलेल्या उदय सामंत यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी या संधीचे सोने केले. आमदार म्हणून ते विजयी झाले. दहा वर्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीला जयमहाराष्ट्र केले आणि शिवसेनेचा भगवा हाती धरला. त्यानंतर ही त्यांची राजकीय घौडदौड कायम राहिली. शिवसेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्यांनी अचूक टायमिंग साधले. युतीच्या काळात त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा आल्यानंतर ही महाविकास आघाडीत मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द बहरली. आता ही त्यांनी योग्य टायमिंग साधत शिंदे गटाचा हात धरला आणि त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ आपसूकच पडली.

शिंदे गटात शेवटच्या क्षणी

जून महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनात बंड केले होते. या बंडात त्यांना आमदारांनीच नाहीतर मंत्र्यांनीही साथ दिली होती. सुरुवातीला सुरत येथे असलेल्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये उदय सामंत यांचा सहभाग नव्हता. ते शिवसेना सोडून जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त होत होता. गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यावर शिवसेनेची भिस्त होती. शिंदेंचं बंड फसणार असं भाकितं वर्तवण्यात येत होती. शिवसेनेने बंड थोपवण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत हे दोन्ही नेते उपस्थित होते. पण नंतर दोघेही नॉटरिचेबल झाले. उदय सांमत 26 जून रोजी नॉटरिचेबल झाल्यानंतर विमानाने थेट गुवाहाटीत पोहचले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. कोकणात शिवसेनाला खिंडार पाडण्यात केसरकरानंतर सामंत यांनी हातभार लावला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.