LOKSABHA ELECTION : वंचित आणि बसपाच्या एंट्रीमुळे पूर्व विदर्भात कांटे की टक्कर, गडकरी, पटोले, पटेल यांचा लागणार कस

पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात रामटेक वगळता कॉंग्रेसची अन्य चार ठिकाणी भाजपसोबत तर रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमदेवारासोबत लढत होत आहे. भाजप आणि कॉंग्रेस या पक्षातच खरी लढत होणार असली तरी बसपा आणि वंचितच्या एंट्रीमुळे येथील लढती रंजक झाल्या आहेत.

LOKSABHA ELECTION : वंचित आणि बसपाच्या एंट्रीमुळे पूर्व विदर्भात कांटे की टक्कर, गडकरी, पटोले, पटेल यांचा लागणार कस
VIDARBHA ELECTIONImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 8:18 PM

मुंबई : निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर, महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी मतदान होईल. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, 2004 पासून पूर्व विदर्भात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. पूर्व विदर्भातील या पाच मतदारसंघात कॉंग्रेसची रामटेक वगळता अन्य चार ठिकाणी भाजपसोबत तर, रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमदेवारासोबत लढत होत आहे. भाजप आणि कॉंग्रेस या पक्षातच खरी लढत होणार असली तरी बसपा आणि वंचितच्या एंट्रीमुळे येथील लढती रंजक झाल्या आहेत. वंचित आणि बसपा यांच्यामुळे मतविभाजनाचा फटका बसू नये याची काळजी घेतानाच भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य 19 तारखेला मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीची वैशिष्ट्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची व्यूहरचना, उमेदवार निवड करण्यात त्यांचे योगदान, एकनाथ शिंदे यांची शिवसेना – अजितदादा यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसोबत केलेली यशस्वी तडजोड, कॉंग्रेसचे नवखे आणि तरुण उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेली निर्णायक भूमिका ही आहेत.

महाराष्ट्रातला निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलला होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथूनच आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे विदर्भातील राजकीय तापमान वाढले. परिणामी भाजपचे बडे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेते प्रचारात उतरले. मात्र, कॉंग्रेसकडून असा बडा नेता मैदानात प्रचारासाठी उतरल्याचे दिसत नाही. कॉंग्रेसचे मित्र पक्षही प्रचारापासून लांब राहिल्याचे दिसत आहे. विदर्भातील पाच मतदारसंघात कोणत्या पक्षांनी कोणते उमेदवार उभे केले आहेत. त्या जागांची काय समीकरणे आहेत हे जाणून घेऊ…

नितीन गडकरी नागपूरमधून हॅट्ट्रिक साधणार का?

भाजपचे केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी हे यावेळी नागपुर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. नागपूर हा मतदारसंघ पूर्वीं कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. सतत सात निवडणुका येथून कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार हे निवडून येत होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांचा सुमारे 3 लाख मतांच्या फरकाने पराभव केला. 2019 मध्ये येथूनच काँग्रेसचे नाना पटोले यांचा गडकरी यांनी पराभव केला. मात्र, यावेळी गडकरी यांचा सामना कॉंग्रेसचे नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांच्याशी होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही नागपूर येथेच आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मूळ गाव. गडकरी यांनी विद्यार्थीदशेपासून नागपूरमधूनच राजकारण सुरु केले. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नाना पटोले यांचा गडकरी यांनी दोन लाख मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे नाना पटोले हे बाहेरचे उमदेवार असतानाही त्यांनी चार लाख मते घेतली होती. पण, आता विकास ठकारे हे नागपूरचेच आमदार आहेत. कॉंग्रेस एकदिलाने प्रचारात उतरली आहे. वंचित आघाडीने येथे कॉंग्रेसला पाठींबा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची बाजू भक्कम झाली असे दिसत असले तरी गडकरी यांचा जनसंपर्क, त्यांनी केलेली विकासकामे ही त्यांच्या जमेची बाजू आहेत. 2024 च्या निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून एकूण 26 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. नागपूरमध्ये दलित मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. वंचितने कॉंग्रेसला पाठींबा दिला असला तरी बहुजन समाज पार्टीचे योगश लांजेवार हे रिंगणात असल्याने ही दलित मते कुणाच्या बाजूने झुकणार हा प्रश्न आहे.

चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार कॉंग्रेसचा विजय रोखणार का?

भाजपने चंद्रपूरमधून राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुरवातीला लोकसभा लढविण्यासाठी सुधीर मुनगंटीवार उत्सुक नव्हते. पण पक्ष आदेश पालन करत त्यांनी प्रचारात स्वतःला झोकून घेतले आहे. 1995 पासून सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक लढवून सातत्याने जिंकत आले आहेत. शिवसेना – भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री होते आणि आता शिंदे सरकारमध्येही मंत्री आहेत.

2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूर या एकाच मतदार संघातून कॉंग्रेसला विजय मिळाला होता. कॉंग्रेसचे सुरेश धानोरकर यांनी या निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र, गेल्यावर्षी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त होती. ही जागा लढविण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्यावतीने दावा सांगितला होता. परंतु, कॉंग्रसने दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चंदपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी प्रमुख लढत होताना दिसेल.

2024 च्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र रामटेके आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले याचा समावेश आहे. गेल्यावेळी वंचितने लाखांहून अधिक मते घेतली होती. तरीही कॉंग्रेसचे दिवंगत खासदार धानोरकर यांनी प्रतीस्पर्धी उमेदवाराचा 44 हजार मतांनी पराभव केला होता.

कॉंग्रेसने उमेदवार बदलला तर, भाजपचा विद्यमान खासदारावरच विश्वास

राज्यातील नक्षलग्रस्त मतदारसंघ म्हणजे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ. 2014 मध्ये मोदी लाट होती. मोदी लाटेमुळे येथून भाजपला विजय मिळाला. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने विद्यमान खासदार अशोक नेटे यांच्यावरच पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. तर, काँग्रेसने यावेळी उमेदवार बदलला आहे. गेल्या दोन निवडणुकीत प्रभाव झालेले नामदेव उसेंडी यांच्याऐवजी कॉंग्रेसने नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशुमार बाबुजा गजबे यांनी 1 लाख 10 हजार मते घेतली होती. तर, विजयी उमेदवार भाजपचे अशोक नेटे यांनी 5 लाख 17 हजार 722 मते घेऊन कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता. नामदेव उसेंडी यांना 4 लाख 40 हजार 386 मते मिळाली होती. त्यामुळे वंचितच्या उमेदवारामुळे कॉंग्रेसचा पराभव झाला अशी चर्चा होती. आता 2024 च्या निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून 10 उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत. वंचितनेही हितेश मढवी हा नवा चेहरा दिला आहे. तर, बहुजन समाज पक्षाने योगेश गोन्नाडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मात्र, यावेळी खरा सामना हा कॉंग्रेस आणि भाजपमध्येच असेल. परंतु, वंचितचे उमेदवार कुणाची आणि किती मते घेतात घेता यावर कोण विजयी होणार हे ठरणार आहे.

2014 चा धमाका पुन्हा होणार का?

राष्ट्रवादीचे सध्या अजितदादा गट असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा-गोंदिया हा पारंपारिक मतदारसंघ. 1991 मध्ये प्रफुल्ल पटेल येथून पहिल्यांदा निवडून आले. 2000 आणि 2006 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. पुन्हा 2009 च्या निवडणुकीत त्यांनी येथून लोकसभा लढविली आणि विजयी झाले. मात्र, 2014 च्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा भाजपचे नाना पटोले यांनी पराभव केला. नाना पटोले हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. पण, त्यांनी आपला कार्यकाला पूर्ण होण्याआधीच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि संसद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. नाना पटोले यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली आणि जिंकूनही आले. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद चालून आले. पण, वर्षभरात त्यांनी त्याही पदाचा राजीनामा दिला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना जयराम पंचबुद्धे यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे डॉ. विजय राजेश नंदुरकर हे 52 हजार 433 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. आता 2024 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून नाना पटोले उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण, कॉंग्रेसने येथून डॉ. प्रशांत पडोळे यांना तिकीट दिले आहे. पडोळे यांची लढत भाजपचे विद्यमान उमेदवार सुनील मेंढे यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात बसपाचे संजय कुंभलकर, वंचितचे संजय केवट, लोक स्वराज्यचे विलास लेंडे यांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या आमदारामुळे रामटेकमध्ये रोमांचक लढत

पाच जागांसाठी विदर्भात मतदानाचा पहिला टप्प्या 19 एप्रिलला पार पडणार आहे. या पाचपैकी केवळ रामटेक लोकसभा मतदारसंघ वैशिठ्यपूर्ण ठरणार आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सामना काँग्रेससोबत होणार आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे यांना शिवसेना पक्षात आणून एकनाथ शिंदे यांनी त्यांना निवडणुकीत उतरविले आहे. राजू पारवे यांच्याविरोधात कॉंग्रेसने श्यामराव बर्वे हे रिंगणात उतरले आहेत.

मुळात कॉंग्रेसने येथून रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला तर त्यांचे पती श्यामराव बर्वे यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे आता श्यामराव बर्वे हे येथून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. या निवडणुकीत रामटेकमधून एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे शंकर चहांदे यांच्यासोबत काँग्रेसचे किशोर गजभिये यांनी बंडखोरी करून अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे कॉंग्रेस उमेदवार श्यामराव बर्वे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.