Anil Parab : अनिल परब ईडीच्या रडारवर! 7 ठिकाणी ईडीची छापेमारी, अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: May 26, 2022 | 9:33 AM

Anil Parab news : अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीकडून छापे सुरू

Anil Parab : अनिल परब ईडीच्या रडारवर! 7 ठिकाणी ईडीची छापेमारी, अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल
अनिल परब
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून (ED) आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे.  तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं. याच्या आगोदर देखील अनिल ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती.

पाहा व्हिडीओ :

अनिल परबांशी संबंधित कोणत्या 7 ठिकाणी ईडीची छापेमारी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या खालीलपैकी सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
  1. परबांच्या शासकीय निवासस्थानी छापेमारी
  2. अनिल परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंच्या निवासस्थानी छापेमारी
  3. परबांच्या सीएच्या घरी छापेमारी
  4. दापोली रिसॉर्ट

बोऱ्या बिस्तारा तयार ठेवावा

किरीट सोमय्यांनी अनिल परबांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब यांनी आपला बोऱ्या बिस्तारा तयार ठेवावा. अनिल परब यांनी शेकडो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. शेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय अशा अनेक ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे. अनिल परब यांचे सहकारी संजय कदम यांच्या घरी सव्वा तीन कोट रूपयांची रोकड मिळाली होती. पंचवीस कोट रूपयांचा रिसोर्ट आहे. आत्ता उद्धव ठाकरे सरकारला जावे लागणार अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे.

हा प्रश्न फार महत्त्वाचा नाही

तपास यंत्रणा त्यांचं काम करीत आहे. हा प्रश्न फार महत्त्वाचा नाही. आज राज्यातील प्रश्न फार महत्त्वाचे आहेत, त्यावर अधिक बोलणं हे चांगलं ठरेल. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. अशा प्रश्नांवरती चर्चा व्हायला हवी.

एक व्यक्ती आहे, तिच्याभोवती राजकारण भिरू नये, विकासाची चर्चा दोन्ही बाजूकडून व्हायला हवी अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुंनगटीवार यांनी दिली.