खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत फेरबदलाचे संकेत, जितेंद्र आव्हाडांना प्रदेशाध्यक्षपद?

एकनाथ खडसेंना महाविकास आघाडी मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल केली जाऊ शकते.

खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत फेरबदलाचे संकेत, जितेंद्र आव्हाडांना प्रदेशाध्यक्षपद?
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 5:47 PM

मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ खडसेंना सामावून घेण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चिन्हं आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादीतही जबाबदाऱ्यांचं फेरवाटप होण्याचे संकेत असून दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. (Eknath Khadse may get Agriculture Ministry Jitendra Awhad may become NCP State President)

एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसेंना विधानपरिषदेवर पाठवण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यानंतर एकनाथ खडसेंवर कृषी मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

सध्या शिवसेना नेते दादा भुसे कृषी मंत्रालयाची धुरा सांभाळतात. खडसेंना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी सेना-राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल केली जाऊ शकते. कृषी मंत्रालयाच्या मोबदल्यात राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेला दिले जाण्याची शक्यता आहे.

गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे गेल्यास जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मंत्रिपद राहणार नाही. त्यामुळे सध्या जयंत पाटील यांच्याकडे असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Eknath Khadse may get Agriculture Ministry Jitendra Awhad may become NCP State President)

एकनाथ खडसे काय म्हणाले ?

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं एकनाथ खडसे भाजपचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, 40 वर्ष काम केलं, खेड्यापाड्यात भाजप पोहोचली नव्हती, मुंडे, महाजन, गडकरी, फरांदे, फुंडकर, मुनंगटीवार यांच्यासोबत प्रामाणिक काम, पक्षाने अनेक मोठी पदं दिली, भाजपवर रोष नाही, केंद्रीय नेत्यावर कधीही टीका केली नाही, असे खडसेंनी सांगितले.

संबंधित बातम्या :

भाजपचा हात सोडताच खडसेंचं ट्विटरवर नवं रुप, नाव आणि कव्हरपेजही बदललं

मी सुद्धा भाजपाचा राजीनामा देतेय, रोहिणी खडसेंचाही एल्गार

खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे : अर्जुन खोतकर

(Eknath Khadse may get Agriculture Ministry Jitendra Awhad may become NCP State President)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.