AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; नाथाभाऊ म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…

या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा? कसली सुव्यवस्था? सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे. तुम्हाला काय करायचे ते करा.

मुख्यमंत्री आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; नाथाभाऊ म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 17, 2022 | 10:10 AM
Share

मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

मुक्ताईनगरमध्ये अंतुरली गावात सभेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते, असं सांगतानाच भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंजवाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत 40 आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची, अशी काव्यमय टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.

काय ती झाडी, काय तो डोंगर हे पाहण्यासाठी जात आहेत. आपण आपल्या आठवणी ताज्या करूया असं सांगून आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आमदारांना घेऊन जात आहेत, असंही ते म्हणाले.

या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा? कसली सुव्यवस्था? सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. पण दोन रुपये किलोचे धान्य तरी द्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा. सर्वात जास्त आत्महत्या तीन महिन्यात झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. माझ्या मुलीला तिकीट दिलं आणि व्यवस्था काय केली तर पाडण्याची, हे मी सांगत नाही तर विद्यमान मुख्यमंत्री मुक्ताईनगरमध्ये येऊन स्वतः सांगत आहेत.

मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले. पाटील यांना निवडून आणण्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा गिरीश महाजनांचा आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनीच गद्दारी केली अशी पावतीच मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दाखल होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे आजी-माजी मंत्री सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?