Video : शिंदे गटातल्या बंडखोर आमदारांमागे अपघाताचं ग्रहण, 4 घटना आणि संजय राऊतांचं ‘ते’ वक्तव्य

या घटनांचं सत्र येत्या काळात असंच सुरु राहिलं, तर शंकेची जागा खात्रीने घेतली तर नवल वाटायला नको.

Video : शिंदे गटातल्या बंडखोर आमदारांमागे अपघाताचं ग्रहण, 4 घटना आणि संजय राऊतांचं 'ते' वक्तव्य
नेमकं असं का होतंय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 12:28 PM

एकनाथ शिंदे (Ekanth Shinde News) गटातल्या आमदारांमागे अपघाताचं ग्रहण लागलंय की काय, अशी शंका कुणालाही येऊ शकते. कारण गेल्या दहा दिवसांत घडलेल्या घटना पाहिल्या, तर त्या काळजी वाढवणाऱ्या अशाच आहे. कुणी बंडखोर आमदारांच्या गाड्यांचे अपघात होत आहेत. आमदार थोडक्यात अपघातातून थोडक्यात वाचले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर एका आमदाराच्या तर चक्क घराचं छतच कोसळलं होतं. गेल्या दहा दिवसांत घडलेल्या या अपघातांमध्ये (Accident News) सोमवारी आणखी एका अपघाताची भर पडली होती. भरत गोगावलेंच्या गाडीचा मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस (Eastern Express Highway) हायवेवर अपघात झाला. यात गाडीचं नुकसान झालं. पण एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असलेले आणि महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले थोडक्यात बचावले होते. या अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या आहे. हे अपघातच आहेत ना? या अपघातांमागे घातपाताचा तर प्रकार नाही ना? अशी शंका कुणाला आली तर आश्चर्य वाटायला नको. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जेव्हापासून बंडखोर आमदारांचा गट महाराष्ट्रात दाखल झाला आहे, तेव्हापासून घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना बारकाईनं पाहण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. कारण गेल्या आठवडाभरात शिंदे गटातल्या 3 आमदारांच्या गाड्यांना अपघात झालाय. तर एका आमदाराच्या घराचं छत कोसळलंय. सोशल मीडियातही हा चर्चेचा विषय झालाय.

घटना क्रमांक 1 : खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला होता. मुंबईत हा अपघात झाला. तारीख होती 5 जुलै. या दिवशी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटना क्रमांक 2 : एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात

सोमवारी, 11 जुलैला मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेवर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात झाला. एकूण सात गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर खुद्द भरत गोगावले यांनी आपल्याला कोणतीही दुखापत जालेली नाही, हेही स्पष्ट केलं. मंत्रालयात जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता.

हे सुद्धा वाचा

घटना क्रमांक 3 : संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात

दिवस होता 6 जुलै. संजय शिरसाट यांच्या गाडी ताफ्यातील वाहन शिरसाटांच्याच वाहनाला धडकलं होतं. बंड यशस्वी झाल्यानंतर संजय शिरसाट आपल्या मतदारसंघात परतले होते. त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी औरंगाबादेत रॅली काढली. या रॅलीत 100 पेक्षा जास्त गाड्या होत्या. पण रॅलीदरम्यान शिरसाटांची गाडी समोरच्या गाडीला धडकली. पाठीमागून येणाऱ्या गाडीचीही शिरसाट यांच्या गाडीला धडक बसली.. अपघातानंतर शिरसाट चांगलेच संतापलेही होते..

घटना क्रमांक 4 : आणि आमदारांच्या खोलीचं छतच कोसळलं!

शिंदे गटात असलेले आणखी एक आमदार म्हणजे सांगोल्याचे शहाजीबापू पाटील. 7 जुलैला तारखेला शहाजीबापू पाटील मुंबईतल्या आमदार निवासात होते. पण शहाजीबापूंच्या समोरच खोलीचं छत कोसळलं. शहाजीबापू यातून अगदी थोडक्यात वाचले. काय ते आमदार निवास, काय ते छत, इथं सगळं नॉट ओके अशी म्हणण्याची वेळ शहाजीबापूंवर आली होती..

4 घटना आणि राऊतांचं वक्तव्य

बंडखोर आमदार आणि त्यांच्या गाड्यांना झालेल्या अपघाताची मालिका यावरुन सोशल मीडियात चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवाय संजय राऊतांचं एक जुनं वक्तव्यही व्हायरल होऊ लागलंय. 50 खोके पचणार नाही, गुलाबरावांचा जुलाबराव होईल. थोड्या दिवसांत सगळ्यांना जुलाब सुरु होती. शिवसेनेशी बेईमानी करणं, हे चांगलं नाही असं म्हणताना संजय राऊतांनी बंडखोरांना इशाराच दिलेला होता.

पाहा व्हिडीओ :

आमदारांच्या वाहनांचे अपघात, संजय राऊतांची वक्तव्य आणि सोशल मीडियातील चर्चा, यांचा एकमेकांना सध्यातरी काहीही संबंध नसला, तरी या घटनांचं सत्र येत्या काळात असंच सुरु राहिलं, तर शंकेची जागा खात्रीने घेतली तर नवल वाटायला नको.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.