AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : माझ्याकडे 50 पेक्षा जास्त आमदार, शिंदेंच्या दाव्यानं शिवसेनेला मोठा हादरा, मग पत्रावर 37 सह्याच का?

Eknath Shinde : 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण 56 आमदार निवडून आले होते.

Eknath Shinde : माझ्याकडे 50 पेक्षा जास्त आमदार, शिंदेंच्या दाव्यानं शिवसेनेला मोठा हादरा, मग पत्रावर 37 सह्याच का?
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 24, 2022 | 10:51 AM
Share

मुंबई : बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानं आता तर शिवसेना (Shiv sena News) पूर्णतः हादरली आहे. पन्नासपेक्षा जास्तीचे आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. दोन तृतीआंशपेक्षा जास्त आमदार (List Of Shiv sena MLA in 20219) आमच्याकडे असून अपक्ष आमदारही आहेत, असं ते म्हणालेत. नंबर आमच्याकडे आहेत. जेवढे पाहिजे त्यापेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत, असंही शिंदेंनी म्हटलंय. नोटीसला आम्ही घाबरत नाही, महिला भगिनींनाही नोटीस पाठवल्या आहेत. आम्ही त्या नोटीसीला भीक घालत नाही. तुम्हाला निलंबनाचा अधिकारच नाही. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलंय. टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. त्यावेळी ते बोलत होते.

पाहा VIDEO :

2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण 56 आमदार निवडून आले होते. त्यापैकी एका आमदाराचं निधन झाल्यामुळे शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांची संख्या ही 55 झाली होती. त्यापैकी दोन तृतींआंश पेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा खुद्दे शिंदे यांनी केला आहे. असं असलं तरी राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये शिवसेनेच्या बरोबर 37 आमदारांचीच नावं आणि सह्या होत्या. असं नेमकं का केलं गेलं? ही देखील शंका आहेच. यावरुनही राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेकडून बारा आमदारांचं निलंबन केलं जावं, अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. तसं पत्रही शिवसेनेकडे पाठवण्यात आलेली आहे. मात्र ही मागणी अवैध आणि बेकायदेशीर आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शिवसेनेकडे आमदारांचं संख्याबळ नसतात, ते अशाप्रकारची कारवाई करुच शकत नाही, असं म्हटलं होतं.

एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रवर सद्या असलेले ते 37 आमदार कोण आहेत, यावरही एक नजर टाका

  1. एकनाथ शिंदे
  2. भरत गोगावले
  3. विश्वनाथ भोईर
  4. महेंद्र थोरवे
  5. शांताराम मोरे
  6. श्रीनिवास वनगा
  7. लता सोनवणे
  8. संजय शिरसाट
  9. ज्ञानराज चौगुले
  10. यामिनी जाधव
  11. शहाजी पाटील
  12. तानाजी सावंत
  13. शंभूराज देसाई
  14. महेश शिंदे
  15. प्रकाश सुर्वे
  16. संजय रायमुलकर
  17. महेंद्र दळवी
  18. संदीपान भुमरे
  19. रमेश बोरनारे
  20. बालाजी किणीकर
  21. अब्दुल सत्तार
  22. प्रदीप जैस्वाल
  23. संजय गायकवाड
  24. चिमणराव पाटील
  25. अनिल बाबर
  26. सुहास कांदे
  27. प्रताप सरनाईक
  28. बालाजी कल्याणकर
  29. किशोर पाटील
  30. योगेश कदम
  31. दीपक केसरकर
  32. मंगेश कुडाळकर
  33. गुलाबराव पाटील
  34. सदा सरवणकर
  35. प्रकाश आविटकर
  36. दादा भुसे
  37. संजय राठोड

वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.