Eknath Shinde: काय ते हाटील, भारीय की पाटील, बंडखोर आमदारांचा गुवाहटीतला दिनक्रम नेमका कसा आहे? 11 गोष्टी न चुकता करतायत

| Updated on: Jun 27, 2022 | 1:34 PM

एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, त्यांच्यासोबत 47 आमदार आहेत. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांच्या सर्व सुखसोयींची काळजी घेतली जात आहे. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांच्या सर्व सुखसोयींची काळजी घेतली जात आहे. रेडिसन हॉटेलच्या आसपास सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत.

Eknath Shinde: काय ते हाटील, भारीय की पाटील, बंडखोर आमदारांचा गुवाहटीतला दिनक्रम नेमका कसा आहे? 11 गोष्टी न चुकता करतायत
Eknath shinde rebel MLA
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोरी करून थेट गुजरात आणि त्यानंतर आता आसाममधील गुवाहटीत ठाण मांडून बसले आहेत. शिंदेंसोबत जवळपास 47 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आलायं. शिवसेनेकडून आमदारांना वापस येण्यासाठी आवाहन केले जातयं. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांचे (MLA) जनसंपर्क कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. शिवसेनेचे आमदार गुवाहटीतील रेडिसन ब्लू या हाॅस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत. या बंडखोर आमदारांचा गुवाहटीतला दिनक्रम नेमका कसा आहे, हे जाणून तुम्हाला आर्श्चय वाटेल. बंडखोर आमदारांचा गुवाहटीतील हाॅटेलमधील दिनक्रम नेमका कसा आहे, याबद्दल सुधीर सुर्यवंशी यांनी एक ट्विट शेअर केले आहे.

सुधीर सुर्यवंशी यांनी शेअर केले ट्विट

बंडखोर आमदारांचा गुवाहाटीतला दिनक्रम

  1. 1.मॉर्निंग वॉक, जिम, स्विमिंग, स्पा
  2. 2. नाश्ता
  3. 3. चित्रपट, बातम्या पाहणे
  4. 4. दुपारचे जेवण
  5. 5. थोडीसी झोप
  6. 6. बैठक, रणनीती
  7. 7. चहा
  8. 8. मसाज
  9. 9. रात्रीचे जेवण
  10. 10. गाणे वगैरे ऐकणे
  11. 11. स्पेशल मसाज आणि त्यानंतर झोपण्याची वेळ

एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, त्यांच्यासोबत 47 आमदार आहेत. गुवाहटीतील हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांच्या सर्व सुखसोयींची काळजी घेतली जात आहे. रेडिसन हॉटेलच्या आसपास सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या टीमसाठी 70 खोल्या बुक केल्याचे सांगितले जात आहे. भाजप नेत्यांची रेडिसन ब्लू हॉटेलला भेटीगाठी सुरूच आहेत. येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण अजून तापतांना दिसणार हे नक्की आहे.