AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : जगभरात एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; पाकिस्तानमध्ये सर्वाधिकवेळा सर्च झाले नाव, फडणवीस, ठाकरेंना टाकले मागे

सध्या जगभरात एकनाथ शिंदे यांचे नाव सर्च केले जात आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये पाकिस्तानातील जवळपास 50 टक्के युजर्सनी एकनाथ शिंदेंबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Eknath Shinde : जगभरात एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; पाकिस्तानमध्ये सर्वाधिकवेळा सर्च झाले नाव, फडणवीस, ठाकरेंना टाकले मागे
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 24, 2022 | 1:10 PM
Share

मुंबई : सध्या अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता परिवर्तन होणार का? सत्ता परिवर्तन झाल्यास मुख्यमंत्री (CM) कोण असणार? मध्यवर्ती निवडणुका लागणार का असे एकना अनेक प्रश्न सध्या पडले आहेत. परंतु यामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाला जगभरात सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदे हे नेमके कोण आहेत? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलं आहे. पाकिस्तान पाठोपाठ सौदी अरेबिया, थायलंड, कॅनडा, नेपाळ, मलेशिया, बांगलादेश आणि जपान यांसारख्या देशात देखील आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. नागरिक एकनाथ शिंदे यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी सर्च करत आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांमध्ये पाकिस्तानात जवळपास 50 टक्के लोकांनी गुगलवर एकनाथ शिंदे यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

फडणवीस, ठाकरेंना टाकले मागे

एकनाथ शिंदे यांचे नाव सध्या जागात एवढ्यामोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे की, शिंदे यांनी या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील मागे टाकले आहे. सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत जवळपास 53 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांचे नाव सर्च केले आहे. जगभरातील 33 देशांमध्ये गेल्या तीन दिवसांत पाच नेत्यांबाबत मोठ्याप्रमाणात माहिती सर्च करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये 54 टक्के, सौदी अरेबियामध्ये 57, मलेशियामध्ये 51 टक्के आणि नेपाळमधील 51 टक्के नागरिकांनी एकनाथ शिंदेंबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकं काय सर्च करण्यात आले?

महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास सर्वच देशातील युजर्सनी थोड्या-फार फरकाने त्यांच्याबाबत सारखीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एकनाथ शिंदे कोण आहेत? त्यांचे सध्याचे पद कोणते आहे. त्यांनी 40 पेक्षा अधिक आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकारला कसे संकटात आणले, एक रिक्षाचालक ते मंत्री असा एकनाथ शिंदे याचा प्रवास याबाबत सर्च करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच शिवसेना, उद्धव ठाकरे, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत देखील सर्च करण्यात आले आहे.

Follow Us
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?