Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं हे उद्धव ठाकरेंविरोधात बंड आहे का? शिवसेना पुन्हा फुटणार?
काल सायंकाळपासून एकनाथ शिंदे यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे. काल शिवसेनेच्या झालेल्या बैठकीला देखील हजर नव्हते. तेव्हापासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा महाविकास आघाडीत एकमत नसल्याची टीका केली होती.

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे. भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणले. त्याचीच पुनरावृत्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. भाजपने काल त्याचे पाच उमेदवार निव़डून आणले. तेव्हापासून महाविकास आघाडी बिघाडी असल्याची चर्चा होती. तसेच एकनाथ शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा होती. काल सायंकाळपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे. त्यांनी अद्याप कोणाशीही संपर्क साधलेला नाही. ते सध्या गुजरातमध्ये काही आमदारांसोबत असल्याची माहिती मिळाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान ते अधिक मीडियासमोर देखील आले नव्हते. काल शिवसेनेच्या (Shivsena) झालेल्या बैठकीला देखील हजर नव्हते. तेव्हापासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा महाविकास आघाडीत एकमत नसल्याची टीका केली होती.
सुरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती
काल सायंकाळपासून एकनाथ शिंदे यांनी आपला मोबाईल बंद केला आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच कालच्या बैठकीला देखील ते हजर नव्हते. पण ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत काही आमदार देखील आहेत. गुजरातमधील सुरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. नाराज एकनाथ मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
नॉट रिचेबलच्या वृत्तानंतरही रिचेबल नाहीत
काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. काल रात्री उशीरा ते हॉटेलमध्ये गेले असण्याची शक्यता आहे. सकाळपासून ते नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं जातं आहे. सगळीकडे राजकीय चर्चांना उधान आलेलं असतानाही ते रिचेबल झालेले नाहीत.
समर्थक आमदारही सोबत
शिवसेनेचे काही आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समजली होती. तेचं आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार इत्यादी आमदार सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेनेचीही प्रतिक्रिया नाही
गेल्या काही दिवसांपासून शिंदे पक्षाच्या कामकाजावर खूश नसल्याच्या बातम्या येत होत्या. तसेच विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत देखील त्यांनी जास्त भाग घेतला नसल्याचं कळतंय. त्यांच्या नॉट रिचेबल असण्यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाहीये.
