Eknath Shinde property : एकनाथ शिंदे यांची प्रॉपर्टी किती? 7 गाड्या, 2 बंदुका आणि तब्बल ‘इतकी’ घरं

Ekanth Shinde Net Worth : 2019-2022 या काळात एकनाथ शिंदे यांची संपत्ती नेमकी किती वाढली?

Eknath Shinde property : एकनाथ शिंदे यांची प्रॉपर्टी किती? 7 गाड्या, 2 बंदुका आणि तब्बल 'इतकी' घरं
एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत

|

Jun 28, 2022 | 11:58 AM

मुंबई : 2019 साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली होती. यात घर, गाडी, मालमत्ता, सोनं, गुंतवणूक, कर्जासह इतर माहिती जाहीर केली होती. 2019 साली महाविकास आघाडी सरकार उदयास आलं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Ekanth Shinde Net Worth) यांना नगरविकास खातं दिलं गेलं. गेल्या अडीच वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत नेमकी किती वाढ झाली, हे कळू शकलेलं नाही. मात्र, 2019 पर्यंत नेमकी त्यांची संपत्ती किती होती, याची आकडेवारी समोर आली आहे. खरंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांचा राजकीय प्रवास हा मोठा संघर्षाचा होता. रिक्षाचालक ते आता बंडखोर शिवसैनिक असा हा प्रवास झालाय. आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मालमत्तेबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

एकनाथ शिंदे यांच्याकडे किती गाड्या?

2019मध्ये एकनाथ शिदे यांच्याकडे एकूण सात गाड्या होत्या. या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत 46 लाख रुपये इतकी होती. यामध्ये स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, अरमाडा, टेम्पो या गाड्यांचा समावेश होते. प्रत्येकी दोन स्कॉर्पिओ आणि इनोव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे होत्या. तर प्रत्येकी एक बोलेरो, आरमाडा आणि टेम्पोचाही यात समावेश आहे.

शिंदेंकडे सोनं किती?

एकनाथ शिंदे यांच्याकडे 110 ग्रॅम सोन स्वतःकडे आहे. तर 580 ग्रॅम सोन बायकोकडे असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलो होती. एकूण 25 लाख रुपयांपेक्षा जास्त सोनं एकनाथ शिंदे यांच्याकडे 2019 साली होती. तशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली होती.

पिस्तूलही आहे आणि रिव्हॉल्वरही..

एकनाथ शिंदे यांच्या एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

जमीन कुठं कुठं घेऊन ठेवलीये?

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. हे जमीनमूल्य 2019च्या बाजारभावाप्रमाणे लावण्यात आलं आहे. त्यात सातत्यानं वाढ होत असते. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या 12 एकर जमीन आहे. तर चिखलगाव, ठाण्यात पत्नीच्या नावे 1.26 हेक्टर जमीन असल्याचीही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली होती.

घरं किती?

वागळे इस्टेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावे 30 लाखांचा एक दुकानाचा गाळा आहे. तर ठाणे पश्चिमेच्या वागळे इस्टेटमधील धोत्रे चाळीत एक घर आहे. हे घर 360 स्केअर फिट आहे. तर लँडमार्क को ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. या फ्लॅटचं क्षेत्रफळ 2370 स्केअर फिट आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावेही असाच एक फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहे. तर शिवशक्ती भवन इथेही एक फ्लॅट पत्नीच्या नावे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली होती. घरं आणि गाळ्याांचा आताच्या घडीचं मूल्य पाहिलं तर ते 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.

2019 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्यावर 3 कोटी 74 लाख रुपयांचं कर्ज होतं. यात TJSB चं दोन कोटी 61 लाखांचं गृहकर्ज असणार आहे. यात श्रीमान रिएलिटीच्या 98 लाखांच्या कर्जाचाही समावेश आहे.

गेल्या 3 वर्षांत किती संपत्ती वाढली?

2019-2022 या काळात एकनाथ शिंदे यांची संपत्ती नेमकी किती वाढली, हे कळू शकलेलं नाही. सध्या एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची मागणी त्यांनी केलीय. सध्या आपल्या 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावादेखील एकनाथ शिंदे यांनी केलाय. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलाय.

हे सुद्धा वाचा

शिंदेंची संपत्ती मुद्देसूद :

  1. गाड्या किती? 7
  2. गाड्यांची एकूण किंमत? 46 लाख
  3. सोनं किती? 25.87 लाख
  4. गुंतवणूक कुठे किती? शिवम ट्रान्सपोर्टमध्ये 3 लाखांची गुंतवणूक, बॉम्बे फूट पॅकर्समध्ये 8 लाखांची गुंतवणूक, शिवम एन्टरप्रायजेसमध्ये 11 लाखाची गुंतवणूक
  5. जमीन-जुमला किती? शिंदे पतीपत्नीच्या नावे 28 लाख रुपयांची शेतजमीन, महाबळेश्वरमध्ये 5 हेक्टर जमीन, ठाण्यात 1.26 हेक्टर जमीन, पत्नीच्या नावे दोन फ्लॅट
  6. कर्ज किती घेतलंय? 2019 पर्यंत शिंदेंवर 3.74 कोटीचं कर्ज

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे झालेल्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde News, Cm Uddhav Thackeray Live

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें