Sanjay Raut : आम्हीही रेडिसन ब्लू हॉटेलला मेल करून कार्यक्रमासाठी 40 खोल्या मागितल्या, पण अजून मेल नाही; राऊतांचा आसामच्या मुख्यमंत्र्यांना डिवचले

| Updated on: Jun 26, 2022 | 11:32 AM

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. माध्यमांशी बोलताना राऊतांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, राऊत म्हणाले की, आम्हीही रेडिसन ब्लू हॉटेलला मेल करून कार्यक्रमासाठी 40 खोल्या मागितल्या आहेत, परंतू अजून त्यांनी आमच्या मेलवरती काही रिप्लाय केला नाहीये.

Sanjay Raut : आम्हीही रेडिसन ब्लू हॉटेलला मेल करून कार्यक्रमासाठी 40 खोल्या मागितल्या, पण अजून मेल नाही; राऊतांचा आसामच्या मुख्यमंत्र्यांना डिवचले
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर दररोज राजकिय घडामोडी घडतायंत. शिंदेंसह शिवसेनेच्या 42 आमदारांनी बंडखोरी केलीयं. यामुळे आघाडी सरकार चिंतेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपाचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येतं आहे. शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले, राऊत म्हणाले की, आम्हीही रेडिसन ब्लू हॉटेलला मेल करून कार्यक्रमासाठी 40 खोल्या मागितल्या आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाचे केंद्रबिंदू हे आमाममधील रेडिसन ब्लू हॉटेल (Radisson Blu Hotel) आहे. तिथेच सर्व बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत.

आसामच्या मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. माध्यमांशी बोलताना राऊतांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, राऊत म्हणाले की, आम्हीही रेडिसन ब्लू हॉटेलला मेल करून कार्यक्रमासाठी 40 खोल्या मागितल्या आहेत, परंतू अजून त्यांनी आमच्या मेलवरती काही रिप्लाय केला नाहीये. बंडखोर आमदार सध्या आसाममध्ये असले तरीही राज्यात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात येते आहे. काल एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उल्हासनगर येथील संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल या प्रकरणात हस्तक्षेप करु शकतात

शिंदे आणि बंडखोर आमदार हा राजकिय तिढा लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर आमदारांवर कारवाई झाली, राज्यात बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत राहिली तर राज्यपाल या प्रकरणात हस्तक्षेप करु शकतील. तसेच आमदारांच्या निलंबनाचा जो मुद्दा उपस्थित झाला आहे, त्यावर हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टातही आमदार जाण्याची शक्यता आहे. यामुळेच येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारण अजून तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.