AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena MLA | औरंगाबादेत बंडखोरांच्या समर्थनासाठी शक्तीप्रदर्शन, सिल्लोडमध्ये सत्तारांसाठी तर पैठणमध्ये भूमरेंसाठी कार्यकर्ते एकवटले

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात बंड पुकारलेल्या आमदारांच्या समर्थकांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन केले. औरंगाबादेत पैठण आणि सिल्लोडमध्ये शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Shivsena MLA | औरंगाबादेत बंडखोरांच्या समर्थनासाठी शक्तीप्रदर्शन, सिल्लोडमध्ये सत्तारांसाठी तर पैठणमध्ये भूमरेंसाठी कार्यकर्ते एकवटले
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 12:17 PM
Share

औरंगाबादः औरंगाबादमध्ये आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेल्या आमदार तथा मंत्र्यांच्या समर्थनार्थ मोठे शक्ती प्रदर्शन केले जात आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या कार्यकर्यांनी तर पैठणमध्ये संदिपान भूमरेंच्या (Sandipan Bhumre) समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. शिंदेसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाबाजी शिवसेना समर्थकांकडून केली जात आहे. सिल्लोड आणि पैठणमध्ये दोन्ही ठिकाणी आज सकाळपासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. आम्ही सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहोत आणि अब्दुल सत्तार यांच्यासाठीच आयुष्यभर काम करणार, अशी प्रतिक्रिया येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आज मोठी रॅली काढली.

सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शक्तिप्रदर्शन

सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. सत्तारांच्या शिवसेना कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपासून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ढोल ताशा वाजवत सत्तार समर्थकांचा जल्लोष सुरू केलाय. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.

पैठणमध्ये भूमरेंसाठी कार्यकर्ते एकवटले

तर पैठणमध्ये रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांच्यासाठी शेकडो कार्यकर्ते एकवटले. पैठण येथील छत्रपती शिवाजी चौकात बंडखोर आमदार संदीपान घुमरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आम्ही एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांचे समर्थक असे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.

‘इथे येऊन निवडणूक लढवून दाखवा’

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर आता शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी आधी महाराष्ट्रात येऊन आमच्यासमोर उघडपणे बोलावं. हिंमत असेल तर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचया नावाशिवाय निवडणुका लढवून दाखवावी, असं आव्हान शिवसेनेनं दिलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

रविवारी राजकीय घडामोडींना वेग

आज रविवार सुटीचा दिवस असला तरीही महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडाडमोडी सुरु आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज मिळाला असून ते राजभवनात पोहोचले आहेत. महाविकास आघाडीतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांवरील कारवाईसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय आज घेतले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट आज नवा गट स्थापनेसंदर्भातील पत्र राज्यपालांकडे पाठवू शकतो. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमध्येही महत्वपूर्ण बैठक झाली. अशोक चव्हाणांनी आज शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर त्यांची भेट घेतली. त्यानंतर आता शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.