राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका काय? एकनाथ शिंदे म्हणतात..

गृहमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde takes charge) यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde takes charge)  यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:40 PM, 13 Dec 2019

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील ठाकरे सरकारचं खातेवाटप झाल्यानंतर, आज मंत्री आपले कार्यभार स्वीकारत आहेत. गृहमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde takes charge) यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde takes charge)  यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सर्व विभागाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. सहा मंत्र्यांकडेच सगळ्या खात्यांचा कार्यभार दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अंतिम खाती जी राहतील त्याप्रमाणे प्रत्येक मंत्री काम करेल”, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री सर्व खात्यांचे प्रमुख असतात. राज्याचा प्रमुख म्हणून सगळ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम त्यांचं असतं ते करतील, असं शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणार का असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेनेने काही मुद्दे उपस्थित केले होते. काही मुद्द्यांवर स्पष्टता नव्हती, त्यामुळे राज्यसभेत सभात्याग केला. राज्यात काय भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील. राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली या सरकारचा कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री महोदय तीनही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करुन, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील”.

हे महाविकास आघाडीचं बहुमताचं सरकार आहे. आमची आघाडी कॉमन मिनीमम प्रोग्रामच्या माध्यमातून राज्याचा कारभार चालू आहे. राज्यातील सर्वांना हे राज्य आपलं वाटलं पाहिजे.

आमचं सरकार सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. या राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, सर्वांना न्याय देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न असेल, असं एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.