AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde vs Shivsena : आमचे गटनेते शिंदेच, भाजपसोबत सरकार बनवा, बंडखोर आमदारांचा शिंदेंना पाठिंबा, उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली

35 आमदारांनी आमचे गटनेते एकनाथ शिंदेंच राहणार असल्याचं म्हटलंय.

Eknath Shinde vs Shivsena : आमचे गटनेते शिंदेच, भाजपसोबत सरकार बनवा, बंडखोर आमदारांचा शिंदेंना पाठिंबा, उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली
एकनाथ शिंदे विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: social
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 21, 2022 | 7:06 PM
Share

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील 35 आमदारांनी आमचे गटनेते एकनाथ शिंदेंच राहणार असल्याचं म्हटलंय. यावेळी त्या 35 आमदारांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला दूर करून भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या या पाठिंब्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची डोकेदुखी वाढल्याचं दिसतंय. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना सूरतमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरु असल्याचं दिसतंय. दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक हे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले आहेत. या भेटीनंतर शिंदेंनी नार्वेकरांकडे तीन प्रस्ताव दिले आहेत. मात्र, एकनाथ शिंदेंकडे 35 आमदारांचा पाठिंबा असल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेकडील आमदारांचं संख्याबळ आणि वाद

  1. एकनाथ शिंदे गट – 35 आमदार
  2. शिवसेना – 14 आमदार
  3. सध्या गटनेते एकनाथ शिंदे
  4. गटनेतेपदावरुन शिंदेंना शिवसेना हटवू शकत नाही.
  5. गटनेतेपदावरुन हटवण्यासाठी शिवसेनेकडे कमी संख्याबळ
  6. शिवसेनेते फूट पडण्याची शक्यता
  7. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशी फूट पडणार?

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं

आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आलीय. एकनाथ शिंदे आमचे सहकाही आहेत, आमचे मित्र आहेत. अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. नक्कीच बाळासाहेब ठाकरे असतील, ते म्हणतात त्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे असतील. या सगळ्यांसोबत एकत्र काम केलं आहे. मुळात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. शेवटी शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. त्यामुळे मी त्यांना आवाहन केलं आहे की मुंबईत या आपण चर्चा करू. तिथे जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही.

अजय चौधरींची गटनेतेपदी नियुक्ती

दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातील हलचालीही चांगल्याच वाढल्या आहेत. शिवसेने तातडीची बैठक घेत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येह अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!