AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे विरुद्ध ठाकरे, सत्तासंघर्षाची सुनावणी 27 सप्टेंबरला, दसरा मेळाव्याआधीच…?

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या खटल्यासंदर्भात आज अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. 27 तारखेच्या सुनावणीत आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल लागण्याची शक्यता आहे, हा निकाल शिंदेंच्या विरोधात लागण्याची शक्यता घटनातज्ज्ञ बापट यांनी वर्तवली आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे, सत्तासंघर्षाची सुनावणी 27 सप्टेंबरला, दसरा मेळाव्याआधीच...?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 24, 2022 | 5:39 PM
Share

संदीप राजघोळकर, नवी दिल्लीः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे.. .शिवसेनेतील दोन नेत्यांमधील आणि एकूणच महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील वादावर येत्या 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra politics) नाट्यावरील सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. 27 तारखेच्या कोर्टाच्या कामकाजात या खटल्याचा समावेश असल्याची माहिती टीव्ही 9 च्या सूत्रांनी दिली आहे. सुनिल प्रभू विरुद्ध राज्यपाल या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे (Supreme court) मुख्य न्यायाधीश उदय लळित यांच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याआधीच राज्यातील सत्तासंघर्षावर मोठा निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दसरा मेळाव्याआधीच?

सुप्रीम कोर्टातील शिंदे विरुद्ध ठाकरे या सत्तासंघर्षाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र मुंबई हायकोर्टात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा, या खटल्याचा निकाल नुकताच लागला. यात उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला.

महापालिकेच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी ज्यांनी प्रथम अर्ज केला, त्यांना मेळावा घेण्याची संधी देण्यात यावी, असं वक्तव्य कोर्टानं केलं. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही जोरदार प्रयत्न केले. मात्र कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटात उत्साह संचारला आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, हायकोर्टाच्या या निकालाविरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु केली आहे. तर दसरा मेळाव्याआधीच सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावरील खटल्याचीही सुनावणी होणार असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत.

घटनातज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला तर?

दरम्यान, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या खटल्यासंदर्भात आज अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. 27 तारखेच्या सुनावणीत आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल लागण्याची शक्यता आहे. तसंच पक्षांतर बंदी कायद्यानुसार, शिवसेनेतून सुरुवातीला बाहेर पडलेल्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई योग्य ठरवली जाईल आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समावेश असल्याने हे सरकार कोसळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

घटनातज्ज्ञ काय म्हणाले पहा-

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं