AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinde Vs Thackeray | सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी आज, ‘या’ वेळेला कोर्टाकडे लक्ष ठेवा

27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्यानुसार शिवसेना पक्षाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते

Shinde Vs Thackeray | सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी आज, 'या' वेळेला कोर्टाकडे लक्ष ठेवा
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 01, 2022 | 8:48 AM
Share

नवी दिल्लीः एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं मुख्यमंत्रीपद वैध आहे की नाही, यावर सुप्रीम कोर्टात (Supreme court) आज महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती, त्यात एकनाथ शिंदेदेखील आहेत. सुप्रीम कोर्टातील घटनापीठासमोर या प्रलंबित याचिकेवर आज सुनावणी आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात आज सकाळी 10:30 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे.

गेल्या 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्यानुसार शिवसेना पक्षाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणूक लक्षात घेता शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले असून ठाकरे तसेच शिंदे गटाला तात्पुरते पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रदान केले आहे.

तर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला सुनावणी घेण्यात येईल असा आदेश दिला होता. एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. तर केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.

आजची शक्यता काय?

  • आज मंगळवारच्या सुनावणीत दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद होईल. अंतिम सुनावणी आजच होण्याची शक्यता नाही.
  •  आमदार अपात्रतेसंबंधी याचिकेवरील सुनावणी आज कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांकडे पाठवली जावी, असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
  • यानंतर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा किंवा नाही, त्यांच्याही पदाला आव्हान दिल्यामुळे तो अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे की नाही, हा महत्त्वाचा गुंता सुप्रीम कोर्टाकडून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला