Eknath Shinde : अनुभवी फडणवीसांपुढे एकनाथ शिंदेंना प्रतिमेचे आव्हान? वेगळेपण दाखवण्यासाठी करावे लागतील ‘हे’ प्रयत्न

मुंबई : सबंध राज्यालाच नाहीतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या (Eknath Shinde) एकनाथ शिंदेना देखील आता (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आणि खूप काही शिकायला मिळेल असेच वाटले असेल. पण ऐन शपथविधीच्या दरम्यान भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयामुळे सत्तेची समीकरणे बदलून गेली आहेत. यामध्ये कसब लागणार आहे ते नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे. […]

Eknath Shinde : अनुभवी फडणवीसांपुढे एकनाथ शिंदेंना प्रतिमेचे आव्हान? वेगळेपण दाखवण्यासाठी करावे लागतील 'हे' प्रयत्न
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजेंद्र खराडे

|

Jul 02, 2022 | 6:04 PM

मुंबई : सबंध राज्यालाच नाहीतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या (Eknath Shinde) एकनाथ शिंदेना देखील आता (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आणि खूप काही शिकायला मिळेल असेच वाटले असेल. पण ऐन शपथविधीच्या दरम्यान भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयामुळे सत्तेची समीकरणे बदलून गेली आहेत. यामध्ये कसब लागणार आहे ते नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे. विरोधकांचा सामना करताना त्यांना आपल्या कामाची चुणूक देखील दाखवावी लागणार आहे. कारण त्यांच्या जोडीला (State Cabinet) राज्य मंत्रिमंडळातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच अनुभवी असे देवेंद्र फडणवीस राहणार आहेत. मुख्यमंत्रीपद सिध्द करण्यासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम तसेच योग्य निर्णय आणि विरोधकांचा सामना अशा एक ना अनेक गोष्टींचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. आतापर्यंत त्यांनी मंत्री म्हणून काम केले असले तरी प्रशासनावरील पकड, आमदारांचा संपर्क, विकास कामे यासाठी फडणवीस यांच्यासारखा अनुभव अद्यापही पाठीशी नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वेगळी इमेज तर तयार करावीच लागेल. अन्यथा नामधाऱ्याचा पडलेला शिक्का काढणे मुश्किल होणार आहे.

पहिल्याच दिवशी घेतलेल्या निर्णयाची चर्चा

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच दुसऱ्याच दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली होती. देवेंद्र फडणवीस हे तर अॅक्शनमोडमध्येच आले आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केवळ रखडलेल्या कामांना गती देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. असे असले तरी ज्या जलयुक्त योजनेला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक दिला तिला पुन्नरजीवन करण्यासह आरे येथूनच मेट्रोमार्ग कायम राहणार असल्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. या दोन्हीही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी राहिलेल्या आहेत. त्यामुळे हे निर्णय कुणाचे आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या हिताच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत आहेत. यामध्येच शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र कऱणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे घेतलेल्या निर्णयामागे कोण हे आता नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यानांचे नवनवीन निर्णय घेऊन वेगळेपण दाखवावे लागणार आहे.

फडणवीसांना प्रशासनाचा अभ्यास

मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रशासकीय अनुभव तर आहेच शिवाय त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देखील 5 वर्ष होते. त्यामुळे प्रशासनातील गचकेखोलगे त्यांना अवगत आहेत. एवढेच नाही कोणत्या विभागातील राजकीय स्थिती, तेथील अंतर्गत मतभेद हे देखील त्यांना माहिती आहेत. हा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना मुख्यमंत्री पदी असलेले शिंदे यांना वेगवेगळे निर्णय तर घ्यावेच लागतील त्याचरबरोबर घेतलेले निर्णय यशस्वीही करुन दाखवावे लागणार आहेत. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल त्याचवेळी शिंदे यांना कामातील वेगळेपण दाखवून द्यावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

अनुभवाचा फायदा मात्र, मार्गदर्शनाची अपेक्षा

देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन किती महत्वाचे राहणार हे खुद्द शिंदे यांनीच पहिल्या दिवशी सांगितले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या कामाचा अनुभव असल्याने जोरात बॅटींग होणार असल्याचे शिंदे म्हणाले होते. त्यामुळे शिंदे गटाचे वेगळेपण दाखवून देण्यासाठी त्यांना स्वत:लाच बॅट हातामध्ये घेणे तेवढेच महत्वाचे आहे. अन्यथा ज्या उद्देशाने हे सर्व घडवून आणले त्याला अंतर पडेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें