LIVE : संजय काकडेंसाठी आता व्याही सुभाष देशमुखांची मध्यस्थी

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 …

LIVE :  संजय काकडेंसाठी आता व्याही सुभाष देशमुखांची मध्यस्थी

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात निवडणुकांची धामधूम सुरु आहे. दिवसभरातील राजकीय घडामोडी एकाच ठिकाणी –

संजय काकडेंसाठी आता व्याही सुभाष देशमुखांची मध्यस्थी

निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातील रुसवे – फुगवे दूर करण्यासाठी आता नात्या – गोत्यांचा आधार, संजय काकडे यांना भाजपमध्ये थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, सुभाष देशमुख संजय काकडेंना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानी, सुभाष देशमुख संजय काकडेंचे व्याही, संजय काकडेंच्या मुलीशी सुभाष देशमुखांच्या धाकट्या मुलाचं मागच्याच वर्षी पार पडलं होतं लग्न

काँग्रेसच्या वेळकाढूपणामुळे आघाडीच्या चर्चेला विलंब : सूत्र

काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या बैठक होणार, दोन ते तीन दिवसात राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर होणार, काँग्रेसच्या वेळकाढूपणामुळे आघाडीच्या चर्चेला उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती

मुलगा सुजयसाठी राधाकृष्ण विखे पाटील थेट सोनिया गांधींच्या भेटीला

सुजय विखे यांच्यासाठी राधाकृष्ण विखेंचा शेवटचा प्रयत्न, राहुल गांधी यांच्याकडे सुजय विखेंच्या उमेदवारीसाठी साकडं, राष्ट्रवादीकडून सुजय लढण्यास राहुल गांधींचा ग्रीन सिग्नल, विश्वसनीय सूत्रांची माहिती, विखे पाटील सोनिया गांधी यांची भेट घेणार, राहुल गांधी यांनी होकार दिल्यास राष्ट्रवादी सुजयला तिकीट देणार, विश्वनीय सूत्रांची माहिती

कॅबिनेट मंत्री महादेव जानकर राजीनाम्याच्या तयारीत, या दोन जागांसाठी आग्रह

माढा आणि बारामती जागा मिळावी असा आग्रह, मुंबईतील महत्वाची बैठक सोडून जानकर गायब, अत्यंत महत्वाच्या कार्यकर्त्यांची बोलावली बैठक, टीव्ही 9 ला सूत्रांची माहिती, दोन दिवसात निर्णय झाला नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा देणार धमकी देऊन गायब झाले जानकर

काँग्रेसचे महाराष्ट्रातील 12 उमेदवार आज जाहीर होणार

आज महाराष्ट्रातील 12 उमेदवार जाहीर करणार आहे,16 मार्चपर्यंत महाराष्ट्रतील सर्व उमेदवारांची नावे घोषित करु. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत यावेत, अशी आमची आजही भूमिका आहे, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात 48 जागा स्वबळावर लढणार

भाजप आणि काँग्रेसला शह देण्यासाठी गरज पडल्यास उत्तर प्रदेशच्या फॉर्म्युलानुसार समाजवादी सोबत युती करणार. भाजप आणि काँग्रेसमधील नाराज बसपाच्या संपर्कात. मायावतींच्या महाराष्ट्रात जाहीर सभा होणार. बसपा मुंबई प्रदेशाध्यक्ष राहुल विद्यागर यांची माहिती.

सांगलीत राष्ट्रवादीचे दिलीप पाटील इच्छुक

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवारीचा अद्याप संभ्रम.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपण ही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास, यात मला संधी मिळेल आणि त्यावर माझाच दावा असेल – राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांचा दावा

कै. राजारामबापू पाटील यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील अजितराव घोरपडे, संभाजी पवार, रावसाहेब पाटील, बसरवराज पाटील आणि आमदार विलासराव जगताप हे सुद्धा मला निवडणुकीत मदत करतील, असा दावादिलीप पाटील यांनी केला.

कोकणात विनायक राऊतांची अडचण

कोकणातले शिवसेनेचे खासदार आणि संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांची अडचण संपता संपेना. आज झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीत ही विनायक राऊत यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी या मतदार संघात भाजपच्या सुरेश प्रभूंना उमेदवारी देण्याची मागणी केली. आता यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढला जाणार आहे. या बैठकीला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड ही उपस्थित होते.

पवारांची माघार, युतीचा विजय – मुख्यमंत्री

युतीचा हा मोठा विजय आहे, देशात मोदींना पाठिंबा देणारे वातावरण आहे. एकदा सभेत मोदी म्हणाले होते की शरद पवार हवा का रुख भाप लेते है, यावेळी त्यांना हे समजले असावे म्हणून माघार घेतली असावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवारांची माढ्यातून माघार

शरद पवारांच्या उपस्थितीत माढ्यातील नेत्यांची महत्त्वाची बैठक

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील बारामती हॉस्टेलला महत्वपूर्ण बैठक सुरु, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माढयातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित, आमदार गणपतराव देशमुख,राष्ट्रवादी सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, भारत भालके, प्रभाकर देशमुख उपस्थित

नाना पटोलेंनी गडकरींविरोधात कंबर कसली

‘मी गडकरींविरोधात नागपुरात निवडणूक लढल्यास प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यात याबाबत बोलणं झालं आहे. प्रकाश आंबेडकर नागपुरात मतांचं विभाजन होऊ देणार नाही. दोन दिवसांत काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढण्यासाठी नाना पटोले यांनी कसली कंबर

प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून लढणार

प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार. अकोला येथे पत्रकार परिषदेत घोषणा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील होण्याच्या चर्चेला जवळपास पूर्णविराम. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ

कोळसे पाटील रिंगणात

निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादमधूल लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी

पुणे – आपकडून असिम सरोदेंचं नाव 

‘पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आम आदमी पक्षाची तयारी.  दिल्लीतील चार वर्षांच्या कामाच्या जोरावर पक्ष रिंगणात उतरणार. लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने शहरी भागावर लक्ष केंद्रित करणार. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता. यामध्ये प्रसिद्ध वकील असिम सरोदे, मुकुंद किर्दत, लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि श्रीकांत आचार्य यांचा समावेश आहे.

भाजपची बैठक

महाराष्ट्र भाजपची लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दादरच्या भाजप कार्यालयात दिवसभर बैठकांचं सत्र होणार आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *