AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीच्या हालचाली? पडद्यामागे घडामोडी वाढल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी पाहता देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

BIG BREAKING | देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीच्या हालचाली? पडद्यामागे घडामोडी वाढल्या
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 25, 2023 | 5:17 PM
Share

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. तसेच महाराष्ट्रात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भाजप्रणित एनडीए सरकारला पायउतार करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. या विरोधी पक्षांच्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवण्यात आलं आहे. असं असताना आता पडद्यामागे आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वर्षभरापूर्वी सरकार स्थापन झालंय. तर विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ते सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. एक गट अजित पवार यांच्या समॉर्थकांचा आहे. तर दुसरा गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थकांचा आहे.

राज्यातील या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर जनता नेमका कल कुणाच्या बाजूने देते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यावर्षी राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. त्याआधी वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली होती. त्यामुळे जनता या घडामोडींना कोणत्या दृष्टीकोनाने पाहते? हे निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जाणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. विशेष म्हणजे अनेक महापालिकांची मुदत तीन वर्षांपासून संपलेली आहे. पण अद्यापही निवडणुका झालेल्या नाहीत. कोरोना संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पण नंतर या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. असं असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 28 जुलैला पुण्यात शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलं आहे. मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....