Devendra Fadnavis: फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, शिंदे मुख्यमंत्री, आता जाहीर केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे पाठिंबा देणार का?

| Updated on: Jun 30, 2022 | 5:35 PM

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता सर्वकाही स्पष्ट झाले असे चित्र होते. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हाच फार्म्युला ठरलेला यामध्ये बदल नाही हीच भावना सर्वसामान्य जनतेची देखील झाली होती. पण राज्यपालांना भेटल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सबंध राज्याला मास्टरस्ट्रोक दिला आहे.

Devendra Fadnavis: फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, शिंदे मुख्यमंत्री, आता जाहीर केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे पाठिंबा देणार का?
उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : राजकीय पटलावर कधी काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या 10 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर आता (Devandra Fadnavis) देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि बंडखोर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री हा जणू फार्म्युला ठरलाच हा समज सबंध राज्याचा झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वकाही चित्र स्पष्ट असेच वातावरण झाले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला मास्टरस्ट्रोक हा राज्यासाठी धक्कादायक ठरलेला आहे. ऐनवेळी  देवेंद्र फडणवीस यांनी जे धक्कातंत्र वापरले त्यामुळे विरोधकांनाच नव्हे तर (BJP) भाजपातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हेच राहणार असून ते एकटेच आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्री पदी शिवसैनिक विराजमान होणार असेल तर मी मुख्यमंत्री पदच नाहीतर पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे शिंदे गटाला पाठिंबा देणार का? हे पहावे लागणार आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर आमदार नाराज असल्याचा ठपका बंडखोर आमदारांनी ठेवला होता. दरम्यानच्या काळात जनेतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शिवसैनिकांना आव्हान करतो की,ज्या शिवसैनिकांना असे वाटत असेल की, मी शिवसेनेचे नेतृत्व करायला नालायक आहे तर मी हे देखील पद सोडायला तयार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदही सोडायला तयार आहे. पण हे सांगणारा शिवसैनिक असणे गरेजेचे आहे.मी शिवसैनिकाला बांधिल आहे. मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे पण मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला हे आनंदाने मान्य असल्याचे ते म्हणाले होते.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको दुसरा कोणीही चालेल असे जरी वाटले तरी मी पदे सोडायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता सर्वकाही स्पष्ट झाले असे चित्र होते. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हाच फार्म्युला ठरलेला यामध्ये बदल नाही हीच भावना सर्वसामान्य जनतेची देखील झाली होती. पण राज्यपालांना भेटल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सबंध राज्याला मास्टरस्ट्रोक दिला आहे. ते स्वत: मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार आहेत तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे असणार आहेत. पडद्यामागे काय गोष्टी घडल्या असतील त्याची नव्याने प्रचिती आता जनतेला येऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील आणि आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सरकार चालेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली.