Devendra Fadnavis : सरकार एकनाथ शिंदेंचं, रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे; उद्धव ठाकरे चितपट?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष आमदार एकत्र आले आहेत. मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार आहे. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचे आणि बाळसाहेबांनी मांडलेल्या हिंदुत्ववादाने भरलेले हे सरकार असेल, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : सरकार एकनाथ शिंदेंचं, रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे; उद्धव ठाकरे चितपट?
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Jun 30, 2022 | 5:29 PM

मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर या सरकारमध्ये आपण नसणार, मात्र या सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे काम करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या मास्टरस्ट्रोकने उद्धव ठाकरे यांना त्यांनी चितपट केले आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर आनंद होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यासाठी आपले पद सोडण्याची तयारीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दर्शवली होती. मात्र बंडखोर आमदारांनी त्यांना कोणतीही दाद दिली नाही. अखेर त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र फडणवीसांच्या खेळीने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष आमदार एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत अजूनही काही लोक येत आहेत. या सर्वांची पत्रे आम्ही राज्यपालांना दिली आहेत. मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार आहे. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचे आणि बाळसाहेबांनी मांडलेल्या हिंदुत्ववादाने भरलेले हे सरकार असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे व्हिजन दाखवले, ते पुढे नेणार. त्याप्रमाणे काम करणार, असे फडणवीस यांनी सांगितले. यावरून शिंदे सरकारवर फडणवीसांचा पूर्ण कंट्रोल राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांचे भरभरून कौतुक

मुख्यमंत्रीपदाची घोषणा आणि नाव जाहीर केल्यानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले आहे. राज्याला विकासाच्या दिशेने नेऊ. देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचा माणूस आहे. ते आमच्यासोबत आहेत. त्यांचे मार्गदर्शन राहील. त्यांनी उदारता दाखवली. ही उदारता दुर्मीळ आहे. स्थानिक पातळीवर एखादे पद सोडायला कोणी तयार नसते, मात्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद आमच्यासाठी सोडले, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचे भरभरून कौतुक केले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें