नाराजी नाट्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Dec 03, 2019 | 6:12 PM

भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे (Pankaja Munde on His Facebook Post).

नाराजी नाट्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

बीड : भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे (Pankaja Munde on His Facebook Post). भाजपचे नेते राम शिंदे आणि विनोद तावडे यांनी देखील आज (3 डिसेंबर) पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यामुळे पंकजा मुंडे आपल्या पुढील वाटचालीबद्दल नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आज पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली (Pankaja Munde on His Facebook Post). यावेळी त्यांनी आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी 12 डिसेंबरला बोलेल असं मी सांगितलं होतं. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. मी ती पोस्ट आत्ता केली आणि आत्ताच त्यावर बोलणं, भाष्य करणं मला शक्य नाही. पण इतकंच सांगते की मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. माझ्या पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली. मात्र, एक दोन वर्तमानपत्रांनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी केली. यानंतर या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्या पद्धतीने हाताळणी सुरु आहे. त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे.”

“माझ्या फेसबुक पोस्टवरील पक्षांतराच्या बातम्यानंतर उलट माझ्यावरच पदासाठी मी हे करत असल्याचा आरोप होत आहे. खरंतर मला कुठलं पद मिळू नये म्हणून तर असं सुरु नाही ना असा मला प्रश्न पडला आहे.”

पहिल्यांदा मी मुख्यमंत्री होणार असा दावा करण्यात आला. 2014 मध्ये तशा बातम्या आल्या होत्या. नंतर मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा बातम्या पेरल्या गेल्या. आता ही बातमी आली आहे. मला ही बातमी व्यथित करणारी आहे. मी विधानसभेला माझ्या मतदारसंघात पराभूत झाली असले तरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मी इतर उमेदवारांच्या सभा घेत होते, असंही पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.

“कोणतंही पद मागण्यासाठी दबावतंत्र वापरणं माझ्या रक्तात नाही”

पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्याकडं उमेदवार येऊन अक्षरशः अश्रू आणायचे आणि सभा घेण्याची मागणी करायचे. मी अत्यंत पोटातून समर्पनाने सेवा केलेली आहे. कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारलेली नाही. तसंच कोणतंही पद मागण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. हे माझ्या रक्तात नाही. त्यामुळे या ज्या चर्चा सुरु आहेत त्यांनी मला व्यथित केलं. म्हणूनच मला आत्मचिंतनासाठी आणि माझ्या लोकांशी काय बोलायचं यावर विचार करण्यासाठी वेळ नक्की दिला पाहिजे.”